esakal | नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate may increases soon nagpur news

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जारी करताना कस्टम ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे गुंतवणूकदार आताच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत.

नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : सोन्याच्या भावांमध्ये सतत घसरण होत असून शुक्रवारी ३०० रुपयांची घट झाली आहे. सोने ४६,६०० रुपयांवर आले आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. मात्र, दिवाळीपर्यंत सोने ६५ हजाराचा आकडा पार करेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी सोने ४७ हजार रुपयांवर होते. त्यात ४०० रुपयाची आज घसरण झाली आहे. 

हेही वाचा - सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जारी करताना कस्टम ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे गुंतवणूकदार आताच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक बाजू ढासळली होती. पण आता सगळे काही पूर्वपदावर येत असल्यामुळे सोन्यामध्ये गुतंवणूकदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एक फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के उत्पादन शुल्क कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचेही सांगितलं. 

हेही वाचा - कार्यक्रम रद्द, मग शाळा-महाविद्यालये सुरू का? पालकांचा...

'सोन्यावर आधी साडेबारा टक्के उत्पादन शुल्क होते. ते आता साडेसात टक्क्यांपर्यंत आणले आहे. पाच टक्के उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. पण दुसरीकडे सरकारने अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावलेला आहे. जे पूर्वी साडेबारा टक्के ड्युटी होती ती आता साडेसात अधिक अडीच म्हणजे दहा टक्के कर हा लागणारच आहे. त्यामुळे अडीच टक्क्याचा निश्चित फायदा हा सोनारांना होईल. किंवा सोने स्वस्त होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

'सोने खरेदीला भारतामध्ये वाव आहे. सोन्याचा दर ५० हजारापर्यंत गेले होते. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा ६५ हजारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोक सोने खरेदी करणे बंद करणार नाहीत', असे मत ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

loading image
go to top