अरे हे काय झालं, पोलिसदादांची धावपळ सुरू अन्‌ं अंगावर उठला काटा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी राबवलेल्या मॉक ड्रिलचे दृश्‍य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी राबवलेल्या मॉक ड्रिलचे दृश्‍य


नागपूर  : जिल्हयातील ग्रामीण भागात अचानक सुरू झालेली पोलिसांची धावपळ पाहून पुन्हा नागरिकांच्या अंगावर कोरोनाच्या भीतीने काटा उठला. परिसर "सिल' झाला, तेव्हा वस्तीत कोरोनाचा रूग्ण आढळला असावा, अशी शंका व्यक्‍त करण्यात येउ लागली...मग नंतर प्रत्येक जण भयग्रस्त नजरेने बघतच राहिला. बराच वेळ गेल्यानंतर "सस्‌पेंस' उलगडला. भविष्यकाळात कोरोनाचा संसर्ग झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची यासाठी आपत्ती व्यवस्थापन व पोलिसांनी रंगीत तालीम घेतल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

संशयीत नजरा आणि चिंता
हिंगणा : पोलिस व आरोग्य विभागाची आज सर्चमोहीम प्रारंभ झाली. या घटनेमुळे भोसलेवाडीत सकाळी खळबळ उडाली. मात्र हा सर्व घटनाक्रम आपत्कालीन व्यवस्थापनाचा मॉक ड्रिल होता, हे नंतर लक्षात आले. नायब तहसीलदार ज्योती भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, गटशिक्षणाधिकारी जयश्री जोशी, पोलीस उपनिरीक्षक ओरके, खुपीया विभागाचे कर्मचारी कमलेश ठाकरे, मुख्याध्यापक उरकांदे, नगर पंचायत कर्मचारी अमोल घोडमारे, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

नरखेडात अफवांचे पेव
जलालखेडा :  भविष्यात जर शहरात कुणी कोरोना बाधित निघाला तर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज नरखेड मध्ये प्रात्यक्षिक करण्यात आले. शहराच्या मध्यभागी असलेल्या वॉर्ड क्रमांक 6 च्या सर्व सीमा सील करण्यात येऊन पूर्णतः संचारबंदी करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रात्यक्षिकामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली होती . तसेच अनेक अफवांचे पेव फुटले होते.
अधिक वाचा :  ऑनलाइन पोर्टलना या वस्तू विकण्याची बंदी ?

आपत्ती व्यवस्थापण समितीची रंगित तालिम
भिवापूर : शहरातील एखाद्या परिसरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास प्रशासन त्याची कशा प्रकारे दखल घेते व कोणती पाऊले ऊचलते, या संबंधाने तालुका आपत्ती व्यवस्थापण समितीकडून आज स्थानिक वार्ड क्र.12 मध्ये ही रंगित तालीम घेण्यात आली. सकाळी सहा वाजता संपूर्ण वार्ड सील करण्यात आला होता.
अधिक वाचा ःवाईटातून काही चांगलेही घडते ते असे; वाचा नेमके नेमके काय?

सहफौजदारी गुन्हा दाखल होणार
वाडी :  न.प. प्रशासनाने 18 एप्रिलला एक परिपत्रक काढून जनतेला जाहीर सुचित केले आहे. यात सार्वजनीक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली असून थुंकल्यास 200 रूपये दंड, चेह-यावर कायम मास्क न वापरल्यास 200रूपये दंड, सोशल डिस्टस्टन्स न पाळल्यास दंडात्मक कार्यवाही करणे, तसेच दुकानदार, फळविक्रेते, भाजीविक्रेते सर्व जीवनावश्‍यक वस्तूविक्रेते यांनीही सोशल डिस्टन्स पाळून 3 फूटाचे मार्किंग करणे आदींचे नियम घालून दिले आहेत.

सुजान नागरिकांनी केले सहकार्य
सावनेर/मौदा :  सावनेर व मौदा तालुक्‍यातही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालिम घेतली. सावनेर तालुक्‍यातील वलनी गावामध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या सूचनेनुसार "मॉक ड्रिल' ऑपरेशन करण्यात आले. शनिवारी सकाळी साडेसात वाजता वल्ली हायस्कूल येथे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे प्रमुख मार्गदर्शनात साहाय्यक गटविकास अधिकारी दीपक गरुड, सीडीपीओ दामोदर कुंबरे गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, विस्ताराधिकारी सुनील शेंडे ,साबळे, आरोग्य सहाय्यक मधुकर सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे आदींसह आशा वर्कर,आरोग्य विभागातील कर्मचारी शिक्षक गण आदींच्या उपस्थितीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करून प्रथम गावातील संपूर्ण रस्ते बंद करून घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची माहिती गोळा करण्यात आली.

रूट मार्चमध्ये आमदार राजू पारवे
उमरेड : लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उमरेड पोलिस ठाण्यातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांचा रूट मार्च निघाला. त्यात विशेष म्हणजे आमदार राजू पारवे हेसुद्धा उपस्थित होते. ते रूट मार्चमध्ये सहभागी होऊन नागरिकांना समजावू लागले. नागरिकांनी बंदला घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राजेश भगत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com