ऑनलाइन पोर्टलना या वस्तू विकण्याची बंदी?

file photo
file photo

नागपूर : सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ई-कॉमर्स पोर्टलना देण्यात आलेल्या परवानगीला अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्गावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

व्यापारी वर्गाचा प्रचंड असंतोष लक्षात घेऊन ऑनलाइन पोर्टलना अत्यावश्यक वस्तू सोडून अन्य वस्तूंच्या विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणीही महासंघाने केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना देशातील ई-कॉमर्स पोर्टलना जीवनावश्यक वस्तूंसह सर्व प्रकारच्या उत्पादनांची घरपोच विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्याला व्यापारी महासंघाने विरोध केला आहे. महासंघाने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्यमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी, सी. भारतीय आणि नागपूरचे सचिव फारुख अकबानी  यांनी दिली.

व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान

देशातील छोटे किरकोळ व्यावसायिक संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीतही सेवा देत आहेत. बंद रस्ते व अनेक अडथळे यासाठी पार करावे लागत आहेत. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर किरकोळ, लहान विक्रेते योद्ध्यांसारखे पुढे आले. त्याचवेळी ई-कॉमर्स कंपन्यांनी मात्र, व्यवसाय बंद केला. या पार्श्वभूमीवर जर ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योगांना सर्व प्रकारची उत्पादने विकायची मोकळीक मिळाली तर, ते आमच्यासारख्यांवर अन्यायकारक ठरेल. याशिवाय, ई-कॉमर्स कंपन्या २१ एप्रिलपासून सर्व उत्पादनांच्या विक्रीची तयारी करत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. यातून नवीन असमतोल तयार होऊन अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतो, असे भारतीया यांनी म्हटले आहे.

ई-कॉमर्स पोर्टलना अनावश्यक वस्तू विक्रीची परवानगी

नुकतेच ऑनलाइन पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्यामुळे ७० कुटुंबांचे विलगीकरण करावे लागले. अशा परिस्थितीत ई-कॉमर्स कंपन्यांच्या कामगारामुळे करोनाची लागण होण्याची दाट शक्‍यता आहे. एकीकडे अत्यावश्यक वस्तूंशिवाय इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले असताना दुसरीकडे मात्र ई-कॉमर्स पोर्टलना अनावश्यक वस्तू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी

ई-कॉमर्स हे एक निव्वळ बाजारपेठेचे ठिकाण असून, त्यांच्यातील नोंदणीकृत विक्रेते लॉकडाउनच्या परिस्थितीत कोणत्याही वस्तू पुरवण्यात असमर्थ असतील, असे  फारूख अकबानी यांनी म्हटले  आहे. याशिवाय ऑनलाईन व्यवसायाला परवानगी दिल्याबद्दल व्यापारी वर्गातुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पारंपरिक व्यवसाय सुरू करायला नियमात परवानगी द्यावी, अशीही मागाणी जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com