बापरे...चोरट्यांच्या टोळीत चक्‍क पोलिस हवालदार, असा झाला भंडाफोड...

Nagpur policeman in robbery gang
Nagpur policeman in robbery gang

नागपूर : मध्य प्रदेशातील बालाघाटमधील बकरी व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकून लुटमार केल्याच्या प्रकरणात मध्यप्रदेश पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये नागपूर शहर पोलिस दलातील कोराडी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस हवालदाराचा समावेश आहे. या अटकेमुळे शहर पोलिस दलाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. दीपक निमोने असे पोलिस हवालदाराचे नाव असून, त्याला नागपूरचे पोलिस उपायुक्‍त निलोत्पल यांनी निलंबित केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन जुलै रोजी बालाघाटमधील तिरोडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यापार करणारे हितेश सुधाकर पारधी याला चौघांनी अडविले होते. हितेश यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकले आणि त्यांच्या खिशातून 54 हजार 500 रुपये लुटले होते. तिरोडी पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला होता.

तपासात पोलिसांनी दीपक घनश्‍याम निमोने (वय 35, रा. वॉर्ड क्र. 2, कोराडी), अनिल कृष्णा उमरे (वय 23, महादुला), इरशाद खान रशीद खान (वय 19, टेकानगर) आणि आकाश हेमराज बोपचे (वय 20, फुलेनगर, महादुला) या चौघांना अटक केली. या टोळीचा म्होरक्‍या दीपक निमोने असून तो नागपूर शहर पोलिस दलात कोराडी ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली. न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसांचा पीसीआर दिला आहे.

असा रचला कट

दोन जुलैला तिरोडीत राहणारे हितेश पारधी यांनी व्यवसायासाठी एमटीएममधून 54 हजार 500 रुपये काढले. त्या एटीएमवर पोलिस हवालदार दीपक निमोने व त्याची टोळी लक्ष ठेवून होता. हितेश याचा कारने पाठलाग केला. खादीटोला कालव्याजवळ हितेश याला अडविले. त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकले आणि पैसे लुटून फरार झाले.

गाठले प्रेमिकेचे घर

हरीश यांची लुटमार केल्यानंतर हवालदार दीपक निमोने आणि साथीदार कारने बोनकटा-तुमसरमार्गे गोंदिया शहरात आले. गोंदियात चार आरोपींपैकी एकाची प्रेमिका राहते. प्रेमिकेच्या घरी चारही आरोपींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी लांजी कारंजा शहरात गेले. या मार्गावर मध्यप्रदेश पोलिसांनी सापळा रचून चौघांनाही अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com