esakal | दारूसाठी वाट्टेल ते... नदीपात्रातून होते नावेने तस्करी
sakal

बोलून बातमी शोधा

liquor

गोंडपिपरी तालुक्‍यातील किरमिरी येथील वर्धा नदीच्या घाटावर चक्क नावेने दारूतस्करी केली जाते. लगतच्या तेलंगणातून मोठ्या प्रमाणात नावेद्वारे गोंडपिपरी तालुक्‍यात दारू आणली जाते. दारू तस्करीचा हा जीवघेणा प्रकार आहे. मात्र, दारूत मिळणारा मोठा नफा बघता दारूतस्कर जीव धोक्‍यात टाकत आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच धाबा पोलिसांनी तस्करांना पकडण्याचा कट रचला. पण ही जीवघेणी तस्करी बघून पोलिसही चक्रावले.

दारूसाठी वाट्टेल ते... नदीपात्रातून होते नावेने तस्करी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धाबा (जि. चंद्रपूर) : दुथडी भरून वाहणारी नदी.. ! गतीने वाहणारे नदीपात्रातील पाणी बघून खरेतर हृदयाचा ठोका चुकतो. मात्र या पात्रातून नावेने दारूतस्करी केली जाते. यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही. मात्र, हे खरे आहे.

गोंडपिपरी तालुक्‍यातील किरमिरी येथील वर्धा नदीच्या घाटावर चक्क नावेने दारूतस्करी केली जाते. लगतच्या तेलंगणातून मोठ्या प्रमाणात नावेद्वारे गोंडपिपरी तालुक्‍यात दारू आणली जाते. दारू तस्करीचा हा जीवघेणा प्रकार आहे. मात्र, दारूत मिळणारा मोठा नफा बघता दारूतस्कर जीव धोक्‍यात टाकत आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच धाबा पोलिसांनी तस्करांना पकडण्याचा कट रचला. पण ही जीवघेणी तस्करी बघून पोलिसही चक्रावले.

पोलिसांनी सहा तस्करांना अटक केली असून, नाव ताब्यात घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र, दारूबंदी नाममात्र ठरली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची तस्करी सुरू आहे. तस्करीसाठी नानाविध कल्पना तस्करांनी अमलात आणल्या. आता तर जीव धोक्‍यात घालून दारूतस्करी सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्‍याला लागूनच तेलंगणाची सीमा आहे. महाराष्ट्र-तेलंगणाला वर्धा नदीच्या पात्राने विभागले आहे. या नदी पात्रातून दारू तस्करी केली जाते.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. वर्धा नदीचे पात्र दुथडी भरून वाहते आहे. धो- धो वाहणाऱ्या नदीपात्रातून नावेने तस्कर तेलंगणा गाठत आहेत. तेलंगणातील दारू नावेने गोंडपिपरी तालुक्‍यात आणली जात आहे. किरमिरी घाटावर हा प्रकार सुरू असल्याची माहिती धाबा उपपोलिस केंद्राचे ठाणेदार सुशील धोकटे यांना मिळाली. धोकटे यांनी पोलिस जवानांना घेऊन किरमिरी घाट गाठला. यावेळी तेलंगणातून नावेने दारू येत होती. नाव किनारी लागताच पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळू ताजणे, प्रदीप उयके, सुनील उयके, नागेश ठाकूर, बंडू पाल या आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात सुशील धोकटे यांनी केली आहे.

हेही वाचा - अबब! नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाजवळ आढळला दुर्मीळ सरडा...कसा बदलतो रंग वाचा...

पोलिसांचे धाडसत्र सुरू
धाबा पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात धाडसत्र सुरू केले आहे. किरमिरी येथील कारवाई आटोपताच डोंगरगाव, धाबा येथे धाडसत्र राबविले. मागील दोन महिन्यांत धाबा पोलिसांनी 38 कारवाया केल्या आहेत.

loading image