आता लवकरच पॉर्नवर येणार निर्बंध

sunil kedar
sunil kedar

नागपूर : अठरा वर्षांखालील मुलांमध्ये पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढल्याने या संदर्भात लवकरच एक धोरणात्मक निर्णय घेऊन निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. इंटरनेटचा वापर वाढला आहे. सोबतच युवकांमध्ये प्रामुख्याने अठरा वर्षांखालील युवकांमध्ये पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. ही गंभीर बाब असल्याने यावर निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली आहे. सरसकट इंटरनेट व मोबाईलच्या वापरावर बंदी घालता येणे शक्‍य नाही. मात्र, अल्पवयीन मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी कशी घालता येईल या दिशेने विचार केला जात आहे. सायबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्या जात आहे. लवकरच याचा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर याबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर करणार असल्याचे पत्रकार क्‍लबमध्ये वार्तालाप कार्यक्रमात केदार यांनी सांगितले.

"नाईट लाईफ' शब्दाला आक्षेप

मुंबईत सुरू केलेल्या "नाईट लाईफ' या शब्दाला आपला आक्षेप आहे. ती एक व्यवस्था आहे. मुंबईची ती गरजसुद्धा आहे. मुंबईत दररोज लाखो लोक येतात. व्यवसायासाठी देशविदेशातील शिष्टमंडळ येत असतात. त्यांच्या सुविधेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. फक्त दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे असा त्याचा अर्थ होत नाही. नाईट लाईफमध्ये रात्रभर बार किंवा दारूची दुकाने सुरू राहणार नाहीत. नागपूरमध्ये तसा प्रश्‍नच उपलब्ध होत नसल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दारूबंदी हटविण्यावर सुरू असलेल्या वादात आपणास पडायचे नाही. मात्र, पालकमंत्री या नात्याने वर्धा जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर आळा घालणे आपली जबाबदारी आहे. याकरिता पोलिसांना पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यासारख्या महान नेत्यांचे वास्तव्य वर्धेत होते. त्यांच्या विचारानुसार गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या पशुसंवर्धन खात्यामार्फत कुक्कुटपालन आणि दुग्ध विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल. अधिकाधिक योजना येथे राबविण्यात येतील, असे केदार यांनी सांगितले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com