तुकाराम मुंढेंची पंचिंग मशीनलाही वाटते भीती, वाचा काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

कर्तव्यदक्ष आयएसएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्‍ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी मुंढे यांनी अधिकारी कर्मचारी येण्यापूर्वीच सकाळी 9.30 वाजता कार्यभार स्वीकारला. दुसरीकडे हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

नागपूर : कर्तव्यदक्ष आयएसएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर मंगळवारी (ता. 28) नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुंढे कडक शिस्तीचे असल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वेळेवर कार्यालयात यायला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारताच पंचिंग मशीन खराब झाल्याने मशीनलाही त्यांची भीती वाटल्याची चर्चा महापालिकेत होती. 

बदलीचे आदेश आल्यानंतरही आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल न झाल्याने नियुक्ती रद्द झाल्याच्या अफवांनी जोर धरला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता अधिकारी व कर्मचारी येण्यापूर्वीच पदभार स्वीकारल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. पदभार स्वीकारताच मुंढे यांनी एचओडी यांची बैठकही घेतली. मुंढे महापालिकेत दाखल झाल्याने सर्वांमध्ये धावपळ माजली होती. 

उघडून तर बघा - अधिकारी, कर्मचारी येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला पदभार

कर्तव्यदक्ष आयएसएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्‍ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी मुंढे यांनी अधिकारी कर्मचारी येण्यापूर्वीच सकाळी 9.30 वाजता कार्यभार स्वीकारला. दुसरीकडे हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तुकाराम मुंढे यांची पंचिंग मशीनलाही भीती वाटली का? अशी चर्चा अधिकारी व कर्मचारी आपसात करीत होते. हा गंमतीचा भाग असला तरी त्यांची कारकीर्द पाहता अनेकांना भीती वाटणारच यात काही शंका नाही. 

आयुक्‍त नव्हे, पाटी जुनीच

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांचीच धावपळ झाली. मुंढे कार्यालयात आल्यानंतर केबिनबाहेर जुन्या आयुक्तांच्या नावाचीच पाटी होती. ती पाटी बदलून तुकाराम मुंढे यांच्या नावाची पाटी लावताना कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. मुंढे केबिनमध्ये गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी चुपचाप केबिनच्या दरवाजावरील पाटी बदलवून तुकाराम मुंढे यांच्या नावाची पाटी लावली. 

चार्ज घेताच लागातात कामाला

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचे निलंबन केले. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्‍टरांनाही त्यांनी निलंबित केले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला होता. कामात कुचराई खपवून घेत नसल्याने त्यांची आजवर अनेकदा बदली झाली आहे. आता ते नागपूर महापालिकेत किती दिवस टिकतात हेच पाहने बाकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punching machine bad when it comes to Tukaram mundhe