भयंकर... "लुटेरी दुल्हन' प्रीती दासने बलात्कार पीडितेला मागितली एवढी रक्कम, वाचा कशासाठी?

अनिल कांबळे 
सोमवार, 15 जून 2020

एकेकाळी सेकंड हॅंड मोपेडवर शहरभर फिरणारी प्रीती दास आज लाखो रुपयांची कार आणि बंगल्यात राहायला लागली होती. "लुटेरी दुल्हन' म्हणून ओळखली जाणारी प्रीती दास आज एक कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

नागपूर : सेमिनरी हिल्स परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय युवतीने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा तक्रार अर्ज दिला. प्रीतीने मित्र असलेल्या साजिद नावाच्या पीएसआयची भेट घेऊन युवतीला मदत करण्यास सांगितले. मात्र, केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून प्रीती दासने बलात्कार पीडितेला 25 हजार रुपयांची मागणी केली होती, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे. 

एकेकाळी सेकंड हॅंड मोपेडवर शहरभर फिरणारी प्रीती दास आज लाखो रुपयांची कार आणि बंगल्यात राहायला लागली होती. "लुटेरी दुल्हन' म्हणून ओळखली जाणारी प्रीती दास आज एक कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने हा सर्व पैसा शहरातील पॉश एरियात फ्लॅट, भूखंड, शेती, महागड्या कार, सोन्याचे महागडे दागिने आणि नातेवाइकांच्या नावावर ठेवल्याची चर्चा शहरभर आहे. त्यामुळे प्रीतीच्या बॅंक खात्यासह तिच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी पोलिसांनी केल्यास मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना मैत्रीपूर्ण संबंधाच्या जाळ्यात ओढल्यानंतर पोलिसांत खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी देत प्रीतीने आतापर्यंत लाखो रुपयांची कमाई केली. सावज टिपल्यानंतर जवळपास पाच ते दहा लाख रुपयांचे टार्गेट प्रीती दास ठेवत होती. त्याच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केल्यानंतर महिन्याभरात प्रीती त्याला ब्लॅकमेल करायची. सेल्फी, फोटो आणि मैत्रीपूर्ण संबंधाचे काढलेले व्हिडिओ पत्नी आणि नातेवाईकांना दाखविण्यासह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी प्रीती देत होती. 

समाजात मान गमविण्याच्या धास्तीने प्रीतीकडून सुटका करून घेण्यासाठी लाखो रुपयांची भेट प्रीतीला देण्यात येत होती. त्याच ब्लॅकमेलिंगच्या बळावर प्रीतीने सोन्याचे दागिने, महागड्या कार आणि आपले शौक पूर्ण केले. पोलिसांनी पीसीआरमध्ये असलेल्या प्रीतीला बोलते केल्यास तिच्या कोट्यवधीच्या संपत्तीचे घबाड बाहेर निघू शकते. तसेच ज्यांना ब्लॅकमेल करून प्रीती कोट्यधीश झाली त्यांनाही न्याय मिळू शकतो. 
 

बॅंक मॅनेजर प्रीतीचा बळी 

कर्ज मिळविण्यासंदर्भात एका बॅंकेच्या मॅनेजरची प्रीतीने भेट घेतली. त्यानंतर त्याच्याशी मैत्री केली. महिनाभरातच पैशाची गरज असल्याचे सांगून त्याला फ्लॅटवर जेवणासाठी आमंत्रित केले. त्याच्याकडून दोन लाख रुपये उसने घेतले. दरम्यान, मॅनेजरच्या कुटुंबीयांची माहिती काढली. पैसे परत मागितले असता प्रीतीने ब्लॅकमेल करणे सुरू केले. पैसे तर सोडाच मॅनेजरला खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकवून नोकरी घालविण्याची धमकी दिली. तो मॅनेजर अजूनही प्रीतीच्या एका मैत्रिणीच्या खात्यात दरमहिन्याला खंडणी स्वरूपात पैसे टाकत असल्याची चर्चा शहरभर आहे. 

प्रीतीच्या वसुलीचा व्हिडीओ व्हायरल 

प्रीती आणि तिच्या टोळीने भंडारा शहरात जाऊन अनेकांना बॅंकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 21 लाख रुपयांची वसुली केली. त्या युवकाच्या बहिणीने प्रीती पैसे घेतानाचे व्हिडिओ काढले. प्रीतीने पैसे वसुली केल्यानंतर नोकरी लावून दिली नाही. त्या युवकाने भंडाऱ्यात प्रीतीवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तसाच एक गुन्हा सीताबर्डीत दाखल आहे. 
 

 पाटील येणार अडचणीत

 
प्रीती दासला पदराआड लपवून तिच्यासाठी मंत्र्या-संत्र्यांची फिल्डिंग लावणारा पाटील आता अडचणीत येणार आहे. प्रीतीचा सीडीआर पोलिस काढत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ती कोणाकोणाच्या संपर्कात होती, याची माहिती मिळविण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यात घिरट्या मारणाऱ्या पाटीलवरही गारपीट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preeti Das demanded Rs 25,000 from the rape victim