सुंदर तरुणींना पुढे करून 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास युवकांना ओढायची जाळ्यात, वाचा...

Preeti Das ruined many unemployed youth
Preeti Das ruined many unemployed youth

नागपूर : "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखरी जाणारी प्रीती दासने सीताबर्डीतील एनआयटी कॉम्पलेक्‍समध्ये पॉश कार्यालयात जॉब कन्सलटन्सी उघडली. तिने विदर्भातील शेकडो उच्चशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंनी गंडा घातला. गंडविल्या गेलेल्या नवल पांडे नावाच्या बेरोजगार युवकाच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी प्रीती दासवर आणखी एक गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे प्रीती दासच्या अडचणीत वाढली आहे. 

सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठगबाज प्रीती दास (वय 38, रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, इंदोरा चौक) हिने सीताबर्डीतील एनआयटी कॉप्लेक्‍समध्ये गॅलक्‍सी कन्सलटन्सी सर्व्हिसेस नावाने कंपनी उघडली. या कार्यालयात सुंदर-सुंदर तरुणींना नोकरीवर ठेवण्यात आले. उच्चशिक्षित तरुणांना फोन करून नोकरी मिळवून देण्याचे आमिष प्रीती दास दाखवत होती. इंजिनिअर असलेला नवल राधेश्‍याम पांडे (वय 28, रा. वर्धा) हा मार्च 2017 मध्ये प्रीती दासकडे गेला. तिने ऑरेंज सिटी वॉटर लिमिटेड कंपनीत 25 हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांना दीड लाख रुपये आणि माझी फी वेगळी द्यावी लागेल, असे सांगितले. सर्व पैसे कॅशने द्यावे लागतील, चेक किंवा बॅंक ट्रान्झॅक्‍शन चालणार नाही, अशी अट ठेवली.

नवल पांडेने तिला दीड लाख रुपये दिले. तिने ओसीडब्ल्यूच्या नावाने तीन महिन्यात अपॉइंटमेंट लेटर तयार करून नवल पांडे याला दिले. नवल पांडे याने ओसीडब्ल्यूमध्ये चौकशी केली असता बनावट लेटर असल्याचे कळले. त्यामुळे त्याने प्रीती दासला पैसे परत मागितले. तिने दमदाटी करीत पैसे परत करण्यास नकार दिला. नवल यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. 

"तुला गंडविलेल्या पैशातून 30 टक्‍के रक्‍कम पोलिसांनासुद्धा देते' असे बोलून पोलिस काहीही बिघडवू शकणार नाही, अशी धमकी देत पैसे परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी नवलने सीताबर्डी पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी आता शनिवारी प्रीती दासवर गुन्हा दाखल केला आहे. 

अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी पडून?

प्रीती दासने अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना लागेल ती मदत वेळोवेळी केली होती. त्यामुळे प्रीती दासच्या विरोधात कुणीही तक्रार दिल्यास त्यावर कारवाई करण्यात येत नव्हती. नवल पांडे याने 15 जानेवारी 2019 रोजी तक्रार अर्ज सीताबर्डी ठाण्यात दिला. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी अर्जावर कोणतीही कारवाई केली नव्हती, हे विशेष... 

लकडगंज पोलिसांची भूमिका संशयास्पद

सुनील पौनीकर याच्याकडून पैशाची वसुली करण्यासाठी प्रीती दासने बायकोला धंद्यावर बसविण्याची धमकी दिली होती. यावेळी दोन पोलिस कर्मचारीसुद्धा प्रीतीसोबत होते. सुनीलने प्रीती दासच्या नावाने चिठ्ठी लिहून 27 नोव्हेंबर 2019 ला विष प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी लकडगंज पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी प्रीती दासविरुद्ध गुन्हे दाखल केला नव्हता. त्यामुळे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे. 

प्रीतीला पोलिस ठाण्याच्या आवारातच झोडपले

प्रीती दास आणि अन्य मैत्रीण प्राजू या दोघी एका पोलिस निरीक्षकाला भेटायला ठाण्यात गेल्या होत्या. ती माहिती पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला मिळाली. त्यानंतर प्रीती दासला त्या अधिकाऱ्याच्या बायकोने पोलिस ठाण्याच्या आवारातच झोडपल्याची चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यावेळी प्राजूने प्रीतीची अवस्था पाहून काढता पाय घेतल्याचे समजते.

प्रीती वावरायची बुशरा खान नावाने

प्रीतीने इरफान नावाच्या एका बॉडीबिल्डर युवकाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. त्याला लग्नाचे आमिष दाखवून 8 लाखांनी लुटल्याची चर्चा आहे. इरफानसोबत राहण्यासाठी तिने स्वतःचे नाव बुशरा खान असे धारण केले होते. त्यानंतर तिने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना आणि काही तरूण पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन अनेकांच्या पगारातील 50 टक्‍के रक्‍कम उकळल्याची माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com