ठकबाज प्रीती दासचा जामीन नाकारला; हे आहे प्रकरण  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

गुड्डूने प्रीती दासला अन्य पुरुषांशी मैत्रीसंबंध ठेवण्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे प्रीतीने चिडून त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. तसेच पैसेही परत न करण्याची धमकी दिली. त्यामुळे गुड्डू तिवारीने पाचपावली पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटल्याची तक्रार दिली.

नागपूर : ठकबाज प्रीती दासचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी बुधवारी नाकारला. प्रीतीने गुड्डू तिवारी या युवकाला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून तब्बल १४ लाख उकळले. 

गुड्डूने प्रीती दासला अन्य पुरुषांशी मैत्रीसंबंध ठेवण्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे प्रीतीने चिडून त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. तसेच पैसेही परत न करण्याची धमकी दिली. त्यामुळे गुड्डू तिवारीने पाचपावली पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर लकडगंज येथील पवनीकर या युवकाकडून पैसे वसुली करण्यासाठी प्रीती दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह त्याच्या घरी गेली होती. 

‘तुझ्या पत्नीला धंद्यावर बसवून पैसे वसूल करेल’ अशी धमकी दिल्यामुळे पवनीकरने आत्महत्या केली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी प्रीती व दोन साथीदारांविरुद्ध पवनीकरला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. तसेच सीताबर्डी पोलिस ठाण्यात एका उच्चशिक्षित युवतीने प्रीती दासने दीड लाखाची फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज दिला होता. तसेच वायुसेनेत असणाऱ्या एका अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने भरोसा सेलमध्ये दाखल तक्रारीसंदर्भात प्रीतीने भेट घेतली. 

हेही वाचा : भयंकरच! नराधमाचे दोन वर्षांच्या मुलाशी केले असे

वायुसेनेच्या अधिकाऱ्याकडून पोलिस निरीक्षक शुभदा संख्ये यांचे नाव सांगून २५ हजार रुपये उकळले होते. या प्रकरणातही जरीपटका पोलिसांनी प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनी प्रीती दास प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preeti Das's bail denied by court