गर्भश्रीमंत व्यावसायिकाने दिली माणुसकीला किंमत; किती पैसा लुटला याला महत्त्व न देता केले हे काम

राजेश रामपूरकर
Friday, 18 September 2020

१९९३ साली स्वतंत्ररीत्या मधुसूदन लॅण्ड डेव्हलपर्स या नावाने फर्म सुरू केली. मित्राच्या मदतीने एका सोसायटीतून दीड लाखाचे वैयक्तिक कर्ज घेतले. हिंगणा जवळील वानाडोंगरी येथे शेत घेतले आणि एका ले-आउटचे काम सुरू केले. आतापर्यंत १५ ले-आउटसची विक्री केली आहे.

नागपूर : चोरट्यांनी हिंगणा येथील पेट्रोल पंपावर दरोडा घातला. येथे तैनात सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. यात किती पैसा लुटला याला महत्त्व न देता पेट्रोल पंपाचे संचालकांनी जखमी सुरक्षारक्षकाला रुग्णालयात हलवले. त्याच्यावर उपचार करून जीव वाचवला. पेट्रोल पंपाच्या मालकाने माणुसकीला किंमत दिली. त्या व्यावसायिकाचे नाव संजय उगले.

संजय आज गर्भश्रीमंत असले तरी त्यांच्या आयुष्याची कथा निराळीच आहे. वडील मधुकरराव उगले हे मूळचे बांभूळगाव (जि. यवतमाळ) येथील रहिवासी. कामानिमित्त नागपुरात आले. रॉकेलची एजन्सी घेतली. मात्र, पाचवीत असताना वडिलांचे निधन झाले. तीन भावंडे लहान, संसाराचा गाडा कसा पुढे ओढायचा याची चिंता आईला सतावत होती. संजयने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणाला जय महाराष्ट्र केला.

जाणून घ्या - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित

एका प्रॉपटी डिलरकडे तीनशे रुपये महिन्याने ऑफीस बॉयची नोकरी करू लागला. दरम्यान, ले-आउटच्या व्यवसायाबद्दलची माहिती मिळवली. त्यातून या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला.

१९९३ साली स्वतंत्ररीत्या मधुसूदन लॅण्ड डेव्हलपर्स या नावाने फर्म सुरू केली. मित्राच्या मदतीने एका सोसायटीतून दीड लाखाचे वैयक्तिक कर्ज घेतले. हिंगणा जवळील वानाडोंगरी येथे शेत घेतले आणि एका ले-आउटचे काम सुरू केले. आतापर्यंत १५ ले-आउटसची विक्री केली आहे.

हिंगणा हा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात लोकवस्ती वाढल्याने उगले यांनी विद्या सर्वो पेट्रोलियम या नावाने पेट्रोल पंप सुरू केला. ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी आजूबाजूचे पेट्रोल पंपवाले नवनवीन युक्त्या करीत होते. त्या भानगडीत न पडता गुणवत्ता आणि प्रामाणिकतेचा फंडा या व्यवसायातही संजय यांनी पूर्णपणे वापरला. त्यामुळे ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला.

असे का घडले? - तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष

विद्यार्थ्यांना मदत

सामाजिक कार्यातही त्यांचा कायम पुढाकार असतो. त्रिमूर्तीनगराजवळील संभाजी चौकात संजय यांनी वयाच्या १८ व्या वर्षी १९९४ साली शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारला. स्वावलंबीनगर चौकात शिवाजी महाराजांचा दुसरा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रम, महाराष्ट्र अध्ययन मंदिर गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना पुस्तके, शूज, शाळेचा पोषाख देऊन मदत करीत असतात.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price given to humanity by the rich businessman