आओ सवॉंरे नयी दुनिया

Adhiveshan.jpg
Adhiveshan.jpg

नागपूर : माती ओली असतानाच तिला हवा तसा आकार दिला जाऊ शकतो. एकदा का ती सुकली की फारसे काही हातात उरत नाही, तसेच बाल्यही असते. मुले लहान असतानाच त्यांच्यावर संस्कार करून त्यांना घडवता येते. एकदा का वय वाढले आणि मने पक्‍की झाली की नंतर त्यांना संस्कारित करणे कठीण असते. मुले लहान असताना त्यांचा अधिकांश वेळ शाळांमध्ये जात असतो. त्यामुळे देशाचे भविष्य असलेली नवी पिढी घडविणे ही जबाबदारी सर्वाधिक शिक्षकांची असते. अलिकडे तर बाह्य जगातली आव्हाने खूप वाढली आहेत, अशावेळी शिक्षकांनी अधिक जागरुक राहणे गरजेचे आहे.

पॉर्न साइट पाहणाऱ्यांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ही शरमेची बाब आहे. वेगवेगळ्या मार्गांनी देशातील पिढी नासवली जात आहे. मात्र, वेळीच मुलांवर संस्कार केल्यास ती संख्या कमी होऊ शकते. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कारीत करावे, असे आवाहन स्व. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.
खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने रविवारी (ता. 5) कोराडी येथील प्रागतिक विद्यालयात आयोजित अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमोद रेवतकर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रागतिक शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश कुंभलकर, विजय आगरकर, कुमुद बालपांडे, मोहन सोमकुंवर, रहमतुल्लाह खान, दीपाली डबली उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे येथपर्यंत पोहोचलो.

डॉ. निंबाळकर म्हणाले की, आज प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे येथपर्यंत पोहोचलो. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्राथमिक शिक्षकांचे महत्त्वही पटवून दिले. प्रकाश कुंभलकर यांनी शिक्षकांचे प्रश्‍न सोडवूनही सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. या वेळी जुनी पेन्शन योजना, वरिष्ठ व निवड श्रेणी, इयत्ता 6 ते 8 संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, सीबीएसई शाळांतील शिक्षकांच्या समस्या, 20 टक्के व वाढीव 40 टक्के अनुदान वाटप यावर विजय आगरकर, कुमुद बालपांडे, मोहन सोमकुंवर, रहमतुल्लाह खान, दीपाली डबली यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक विजय नंदनवार यांनी केले. संचालन चंद्रप्रभा चोपकर, संजय बोरगावकर यांनी केले. आभार गोपाल मुऱ्हेकर यांनी मानले. अधिवेशनात आठ ठराव पारित करण्यात आले. आयोजनासाठी राजकुमार शेंडे, पवन नेटे, गंगाधर करडभाजणे, प्रमोद कुंभारे, गोपाल मुऱ्हेकर व ज्ञानेश्‍वर घंगारे यांनी सहकार्य केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com