esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Priti defending PI bhole who misbehaved with widow in Nagpur

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात कार्यरत पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याने गिट्टीखदानमधील विधवा महिला हिला फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बलात्कार करून तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले.

उपराजधानीत ‘लुटेरी दुल्हन’ पुन्हा सक्रिय; बलात्काराचा आरोपी भोळेच्या मदतीला धावली ‘प्रीती’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक अरविंद भोळेवर गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल होताच ‘लुटेरी दुल्हन’ पुन्हा सक्रिय झाली. तीचे जून प्रेम पुन्हा उफाळून आले असून ‘प्रीती’ने धावपळ करीत वकिलाची भेट घेतली आहे. प्रियकराला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी तिची धडपड सुरू झाली आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात कार्यरत पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याने गिट्टीखदानमधील विधवा महिला हिला फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बलात्कार करून तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. एक लाख रुपये आणि ४ लाखांच्या सोन्याच्या बांगड्या भोळेने चोरून नेल्या. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच भोळे नागपुरातून फरार झाला. 

 हेही वाचा - धक्कादायक! ४२ योजनांमध्ये लाच घेताना अडकले तब्बल ३६२ अधिकारी; गेल्या पाच वर्षातील सापळे

पोलिस आयुक्तांनी त्याचे निलंबित केले आहे. गिट्टीखदान पोलिस त्याला अटक करतील, या धाकाने त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले. प्रियकर अडचणीत असल्याचे बघून त्याची जुनी प्रेयसी प्रीती ही सक्रिय झाली आहे. तिने नागपुरातील एका नामांकित वकिलाची भेट घेतली. भोळेच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, कागदपत्रे आणि शुल्क जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन प्रेयसींची ऑडिओ क्लिप व्हायरल

पीआय अरविंद भोळेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या काही महिलांनी ‘ती मी नव्हेच’ अशी भूमिक घेतली आहे. भोळेच्या दोन प्रेयसींचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात भोळेने कसे आपल्याला फसवून शोषण केले, याची आपबिती दोघीही एकमेकींना सांगत आहेत.

हेही वाचा - हादरवणारी घटना! पाणीपुरी खाण्याचा मोह बेतला जीवावर; तब्बल ९५ जणांचा जीव धोक्यात; एका मुलीचा मृत्यू...

पोलिस अधिकाऱ्याचा फ्लॅटची चर्चा

भोळेने फ्रेंड्स कॉलनीतील फ्लॅटवर विधवा महिलेला ठेवले होते. तो फ्लॅट एका वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याने मोक्काचा आरोपी रोशन शेखकडून कमी पैशात विकत घेतला आहे. त्याबदल्यात त्या अधिकाऱ्याने शेखूला अनेक अवैध धंद्यात मदत केली तर काही प्रकरणात कारवाईपासून वाचविले आहे. त्याला शेखूने आयफोनसुद्धा गिफ्ट केला आहे, अशी चर्चा आहे. भोळे प्रकरणात त्या अधिकाऱ्याचीही चौकशी होणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top