कदाचित अधिकाऱ्यांत समन्वय जमला असता तर नसता आला भाऊ, बिनपावसाचा पूर...

पारशिवनीः तालुक्यातील पेंच नदीच्या महापुराच्या पाण्याने वेढलेल्या वस्त्या.
पारशिवनीः तालुक्यातील पेंच नदीच्या महापुराच्या पाण्याने वेढलेल्या वस्त्या.
Updated on

पारशिवनी/कन्हान (जि.नागपूर) : २८ व २९ऑगष्टला नयेगाव खैरी पेंच धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पेंच नदीला महापूर आला. या महापुरात नदीकाठावरील गावे संकटात सापडली. जीवितहानी होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. या पुरामुळे पारशिवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात बुडाल्याने शेतीचे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. त्यातच सालई माहुली पूलही वाहून गेला नी नयाकुड पुल क्षतिग्रस्त झाला. अनेक गावखेडी पुराच्या पाण्याने वेढली होती. या स्थितीसाठी जवाबदार कोण, असा प्रश्‍न केला जात आहे. पेंच धरणाच्या विभागीय कार्यालयात प्रकल्प अधिकारी एकच असल्यामुळे पाण्याचा विसर्ग करताना समन्वय साधण्यात दिरंगाई झाली आणि कन्हान नदीने रौद्र रूप धारण केले, असा आरोप आता ग्रामस्थ करीत आहेत.

अधिक वाचाः देवा रे देवा! काय झाले मोसंबीच्या बागांना, रात्रभरात फळे गेली कुठे? वाचा…

असे घडले महापुरामागचे राजकारण
चौराई धरणाचे पाणी तोतलाहडोह धरणात सोडण्यात आले. तोतलाडोह धरणाची पाण्याची पातळी अधिक वाढणार नाही, याची दक्षता घेण्याकरीता अधिकचे  पाणी धरणात जमा झाल्यास तेच पाणी पेंच धरणात सोडण्यात सोडण्यात येते. पाणी सोडतेवेळी याबाबतची सूचना संबधित अभियंत्यांना ४ ते ६ तासांपूर्वी देण्यात येते. तोतलाडोह येथील अभियंत्यांनी २८ ऑगष्टला दुपारनंतर ५ मीटरने  तोतलाडोह धरणाचे दरवाजे उघडले जातील, अशी सूचना पेंच धरणाचे अभियंता प्रणय नागदिवे यांना ४ तास अगोदर दिली होती.  तोतलाडोह व पेंच धरणाचे विभागीय कार्यालय, प्रकल्प अधिकारी एकच असल्याने नियोजनाच्या समन्वयात तफावत दिसून आली. कारण तोतलाडोह धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पेंच धरणाच्या क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची गती आणि  पेंच धरणातून बाहेर जाणारा पाण्याच्या विसर्ग वेळीच नियंत्रणात ठेवण्याचे  सांगण्यात आले होते. ३२४ मीटरच्या वर असलेली पाण्याची ‘लेवल’, नदीत जाणारा प्रवाह व्यवस्थित सुरु होता. तोच प्रमाणवेळेनुसार कमी जास्त करणे आवश्यक होते. पण हीच ‘लेवल’  २९ऑगष्टला दुपारपर्यंत नियंत्रणात होती. परंतू दुपारनंतर नदीतील प्रवाहाचा विसर्ग कमी केल्याने  पेंच धरणातील जलपातळी ही ३२६ वर गेल्याने घाईघाईत येथील उपविभागीय अभियंता प्रणय नागदिवे व शाखा अभियंता रामटेक यांनी धरणातील पाण्याचा कसलाही  हिशेब न ठेवता मानसिक तणावात येऊन धरणाचे १६ ही दरवाजे ६ मीटरने उघडल्याने  नदीत पुराची परिस्थिती हाताबाहेर गेली.

अधिक वाचाः‘सालई, माहुली’ला जलसमाधी, नयाकुंड मात्र जुना असूनही साबूत, काय भानगड आहे, वाचा…

सखोल चौकशी करण्याची मागणी
नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने पाणी उमरी, सालई माहुली, नेउरवाडा, डोरली, वाघोडा, मेहंदी, जुनी कामठी, धाटरोहना, पारशिवनी व इतर गावे पाण्याखाली आल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान, घरांची पडझड झाली व जनावरे वाहून गेली. त्यातच सालई माहुली येथील पूल पाण्यात वाहून गेला. नयाकुड पूलही क्षतिग्रस्त झाला. या सर्व प्रकरणात धरणातील पाणी  नियमानुसार सोडले नसून या पाणी सोडण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपसभापती चेतन देशमुख, प्रेमचंद कुसुबे, इंद्रपाल गोरले,  कैलास शिललार, कमलाकर कोठेकर, राधेश्याम  गजभिये, सरपंच खेमराज दरणे, वैभव खोब्रागडे, शुभम राऊत, भूपेंद्र खोब्रागडे व इतर ग्रामस्थांनी  केली आहे.
हेही वाचाः  शिकावयाचे की कोरोनाचे काम करायचे, शिक्षकांचा सवाल

दवंडी व सतर्कतेची माहिती न दिल्याने घडले विपरीत
कन्हानः शुक्रवारी रात्री  तोतलाडोह धरणाचे पूर्ण गेट उघडून पेंच धरणात आणि कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाने दवंडी किंवा सतर्कते माहिती न दिल्याने शुक्रवारी मध्यरात्री जवळपास दीड वाजतापासून पिपरी गावाला लागून असलेल्या वेकोलि खुली कोळसा खदानीच्या डंम्पींग मातीमुळे पुराचे पाणी पिपरी गावात शिरले. त्यामुळे नागरिकांची भयंकर फजिती झाली. कुठल्याही सूचना न मिळल्याने नदीचे पाणी संपूर्ण पिपरीच्या नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांना त्यांचा कुटुंबासह जीव वाचवून सुरक्षितस्थळी जाणे भाग पडले. नागरिकांच्या घरात असलेले जीवनावश्यक साहित्य पुरात वाहून गेले. पुरामुळे घर कोसळल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्र्यांनी कन्हान-पिपरी येथील नुकसानग्रस्त गावांचा दौरा  केला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त पिपरीच्या नागरिकांना आर्थिक मदत देऊन चौकशी करून पुनर्वसन करण्याची मागणी केली. यावेळी प्रशांत बाजीराव मसार, आकाश महातो, अंकुश भोयर, संपत बावणे, वृषभ हावरे, नाना खोब्रागडे, शिवा कुर्वे, बंडू मेश्राम, कुणाल खडसे, संजय हावरे, रवि मेश्राम, अनिल केवट, अमोल गजभिए, भोला भोयर, मंगेश मेश्राम, आनंद भुरे, राजू चौरे, सुशांत बर्वे, अभिषेक नारनवरे, प्रमोद राऊत , गणेश बागडे आदी गावकरी उपस्थित होते.


संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com