नागपूरच्या मेडिकलमधील चाचण्यांचा वेग मंदावला; आज नवे ३९८ कोरोनाग्रस्त तर ९ जणांचा मृत्यू 

Process of corona testing is getting slow in Medical Nagpur
Process of corona testing is getting slow in Medical Nagpur
Updated on

नागपूर ः हवेतील गारवा वाढत आहे, तस तशी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या धास्तीची हुडहूडी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. थंड वातावरण विषाणूजन्य आजाराला पोषक असते. त्यामुळेच डिसेंबरच्या अखेरीस कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातून ३९८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद घेण्यात आली. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ३७१ आहे. मागील चार दिवसांपासून कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. त्यात २४ तासांमध्ये ९ जण दगावले आहेत. यामुळे आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या ३ हजार ८४१ वर पोहचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १९ हजार ६१९ झाली आहे. तर १ लाख ९ हजार ७७७ कोरोना विषाणूमुक्त होऊन ठणठणीत बरे झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या कमी होत असतानाही कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येत आहे. विशेष असे की, यापुर्वी सहा हजार चाचण्या होत असताना तीनशेच्या आत रुग्णसंख्ये होती. मात्र शनिवार(ता.१९) ४ हजार ३१६ चाचण्यामंध्ये ३९८ जणांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. नेहमीप्रमाणे सर्वाधिक रुग्णसंख्या खासगी प्रयोगशाळेतून आढळून येत आहे. खासगीत १७१९ चाचण्या झाल्या असून यातील १४९जण बाधित आढळले आहेत. मेडिकल आणि मेयोतील कोरोना चाचण्यांची गती मंदावली असल्याचे दिसून येत आहे. 

मेडिकलमध्ये अवघ्या ४२३ तर मेयोत ८४९ चाचण्या झाल्या आहेत. यापेक्षा दुप्पट चाचण्या खासगीत होत आहेत. मेडिकलमधून ४८ तर मेयोतून ७९, निरीतून २२, एम्समधून १५, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॅबमधून ४३ तर माफसूमधून १३ जण बाधित आढळले आहेत. अँटिजन रॅपिड टेस्टमधून २९ जण बाधित आढळले. या घडामोडीत आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ९ कोरोनाबाधित दगावले. यामुळे कोरोनाचे मृत्यूसत्रही सुरूच असल्याने धास्तीत वाढ होत आहे. यातील शहरात ३ तर ग्रामीण भागातील २ आणि जिल्ह्याबाहेरचे ४ जण दगावले आहेत.

८ लाख ८१ हजार चाचण्या

मागील अकरा महिन्यात नागपूर जिल्ह्यात ८ लाख ८१ हजार३१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील ५ लाख २७ हजार १९९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८३२ ॲन्टीजन रॅपिड चाचण्या झाल्या आहेत. विशेष असे की, एकूण चाचण्यांपैकी १ लाख चाचण्या मेडिकलमध्ये झाल्या आहेत. मेयोतही सुमारे १ लाख २५ हजारावर चाचण्या झाल्या आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com