बापरे... तब्बल दहा डॉक्‍टर होणार होम क्वारंटाईन; त्यांच्या संपर्कात अनेक, आता...

केवल जीवनतारे
Tuesday, 4 August 2020

आठवडाभरापुर्वी शासकीय दंत महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक, निवासी डॉक्‍टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी तसेच सफाई कामगार अशा सात ते आठ जणांना कोरोना विषाणूने विळख्यात घेतले. ज्यांना रक्तदाब, मधुमेह असे जोखीमीचे आजार आहेत, त्यांना कोरोनाच्या कामात घेऊ नका, असे शासनाचे आदेश असतानाही दंत प्रशासनाने त्यांना संशयितांचे नमुने घेण्याच्या कामाला जुंपले होते.

नागपूर : कोरोनाच्या आणिबाणीचा काळ आहे. सारे सामाजिक अंतर ठेवून एकमेकांशी संवाद साधतात. मात्र, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने या सामाजिक अंतराला (सोशल डिस्टन्सिंग) फाटा देत मौखिक दिनाचा जणू सोहळाच साजरा केला. मात्र, या सोहळ्यात उपस्थित दंत चिकित्सक कोरोनाबाधित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यामुळे दंतमधील दहापेक्षा अधिक प्राध्यापकांनी अधिष्ठातांकडे सामूहिक अर्ज करून स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. यामुळे दंतचे काम आता ठप्प होणार.

विशेष असे की, कार्यक्रमात सहभागी डॉक्टरने रक्तदाब, मधुमेह असे आजार असूनही त्यांनी कोविड नमूने घेण्याच्या कामावर जुंपण्यात आले होते. पहिल्या चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतर ते प्रशासनाच्या सांगण्यावरून रुजू झाले आणि आठवडाभरापासून सामान्याप्रमाणे दंत महाविद्यालयात वावरत आहेत. अचानक कोरोनाचा झाल्यामुळे सारे दंत महाविद्यालय कोरोनाच्या विळख्यात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक माहितीसाठी - तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...
 

आठवडाभरापुर्वी शासकीय दंत महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक, निवासी डॉक्‍टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी तसेच सफाई कामगार अशा सात ते आठ जणांना कोरोना विषाणूने विळख्यात घेतले. ज्यांना रक्तदाब, मधुमेह असे जोखीमीचे आजार आहेत, त्यांना कोरोनाच्या कामात घेऊ नका, असे शासनाचे आदेश असतानाही दंत प्रशासनाने त्यांना संशयितांचे नमुने घेण्याच्या कामाला जुंपले होते. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या दंत कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे सुत्रांनी सांगितले. शासनाच्या सूचनांप्रमाणे शासकीय दंत महाविद्यालयातील दंत चिकित्सकांनी काम करण्यास सुरुवात केली आहे, असे दंतचे अधिष्ठाता सांगतात.

मौखिक दिन कार्यक्रमाचा आग्रह का?

कोरोनाच्या संकटामुळे शहरातील शाळांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग , कार्यक्रम सारे वेबिनार, ऑनलाईऩ होत आहेत. मात्र शासकिय दंत महाविद्यालय प्रशासनाने मात्र नोटीस काढून १ऑगस्टचा मौखिक दिनाचा कार्यक्रम ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे औचित्य काय होते, हेच कळालया मार्ग नाही, ही दंतमधील एका अधिकाऱ्याची बोलकी प्रतिक्रिया आहे. या कार्यक्रमात अधिष्ठातांपासून तर सारेच प्राध्यापकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला आहे.

 

‘सकाळ'ने दिला होता इशारा

कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देऊन कोविड संशयितांचे नमूने घेण्याच्या कामाला शासकीय दंत महाविद्यालयात जुंपण्यात आल्याची तसेच कोरोनाच्या रडावर शासकीय दंत महाविद्यालय या आशयाखाली दै. सकाळने वृत्त प्रकाशित केलो होते. नुकतेच पाच दिवसांपूर्वी डॉक्टर, निवासी डॉक्टरांसह कर्मचारी कोरोनाबाधित आले. तसा अहवाल प्रयोगशाळेतून आला. यानंतर एका दंतच्या डॉक्टरने विलगीकरणानंतर कामाला सुरूवात केली. विलगीकरणात असताना त्यांची चाचणी निगेटिव्ट आला. परंतु मौखिक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्रास जाणवला. त्यांनी चाचणी केली आणि ते कोरोनाबाधित आढळले. यामुळे त्यांना ते रुग्णालयात किंवा एम्समध्ये दाखल होतील. परंतु, त्यांच्या संपर्कात शेकडो लोक आले. त्यांचे काय? सारे शासकीय दंत महिवद्यालय व रुग्णालय कोरोनाग्रस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच साऱ्या प्राध्यापकांनी प्रशासनाला पत्र सादर करून होम क्वारंटाईन जाण्यासाठी अर्ज दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor of Government Dental Hospital is Home Quarantine