फुफ्फुस संशोधन संस्था हवेत , एका ठिकाणी होणार होते उपचार

The proposal of the Lung Research Institute was rejected
The proposal of the Lung Research Institute was rejected
Updated on

नागपूर : उपराजधानीत फुफ्फुस संशोधन संस्थेसाठी मेडिकलकडून विविध बदल करुन तीन वेळा हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याला सादर करण्यात आला. परंतु, आधीच्या राज्य सरकारने केंद्राकडे हा प्रस्ताव सादर केला नाही, अशी माहिती पुढे आली आहे. 

नागपुरात फुफ्फुस संसर्ग आजारावर अद्ययावत उपचार व संशोधनासाठी संशोधन संस्थेला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मेडिकलमध्ये ही संस्था उभारण्यासाठी राज्याने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी सूचना केली होती. मात्र, असा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात न आल्यामुळे ही संस्था हवेतच आहे.

विदर्भात 14 औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. यामुळे प्रदुषणासह धूम्रपानाच्या व्यसनामुळे दमा, संसर्ग, कर्करोग या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मेडिकलमध्ये दरवर्षी 50 जणांचा फुफ्फुसांच्या विविध आजारांमुळे मृत्यू होतो. यावरील उपचारांसाठी मुंबई, दिल्ली गाठावी लागत असल्यामुळेच गडकरी यांनी मेडिकलमध्ये फुफ्फुस संशोधन संस्था केंद्राकडून मंजूर करवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी मेडिकलला प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. या प्रस्तावानुसार येथे लहान मुलांच्या श्‍वसन रोग विभागापासून ते मोठयांच्या छातीच्या शस्त्रक्रिया असे विभाग प्रस्तावित होते. 

600 कोटींचा प्रस्ताव 
मेडिकलमधील केंद्र 195 खाटांचे असेल, असे प्रस्तावात होते. गडकरींच्या सूचनेनंतर राज्यात भाजपची सत्ता असताना 2016 मध्ये श्‍वसनरोग विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. एस. व्ही. घोरपडे यांनी हा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याकडे पाठवला. प्रस्ताव अंदाजे 600 कोटींचा होता. त्यानंतर या प्रस्तावात सुधारणा सुचवत येथे हेलिपॅडसह इतरही सुविधा असाव्यात, अशा सूचना केल्याने प्रस्ताव 900 कोटींवर पोहचला. हा प्रस्ताव 2019 मध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याकडे पाठवण्यात आला. तथापि, शासनाकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगत हा प्रस्ताव परत पाठवला गेला. या संस्थेसाठी टीबी वार्ड परिसरातील 25 एकर जागा प्रस्तावित होती. यासंदर्भात मेडिकलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

असा होता प्रस्ताव 
60 खाटांचा श्वसन विभाग 
60 खाटांचा क्षयरोग विभाग 
10 खाटांचा ऑबस्ट्रक्‍टीव्ह एअरवे डिसिज विभाग 
5 खाटांचा निद्रा विकार 
5 पाच खाटांच इंटरव्हेंशनल पल्मोनरीलॉजी विभाग 
10 खाटांचे इन्टरमेडिएट रेस्पीरेटरी केअर युनिट 
20 खाटांचा शस्त्रक्रिया विभाग 
10 खाटांचा पेडिऍट्रिक पल्मोनोलॉजी विभाग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com