जर्मनीच्या सहकार्याने 'पब्लिक बाईक'; पूर्व नागपुरात प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एनएसएससीडीसीएल) यूरोपीय संघाच्या सहकार्याने आज महापालिकेत 'पब्लिक बाईक शेअरींग' विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत उपयुक्त मॉडेलवर चर्चा करण्यात आली.

नागपूर : शहरात 3400 किमीचे रस्ते असून यातील 400 किमी रस्त्यांवर सायकल लेन तयार करण्यात येत आहे. या रस्त्यांवर 'पब्लिक बाईक शेअरिंग'चा प्रकल्प जर्मनीतील कार्ल्सरूह शहराच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्व नागपुरात स्मार्ट सिटीअंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा -  डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण?

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एनएसएससीडीसीएल) यूरोपीय संघाच्या सहकार्याने आज महापालिकेत 'पब्लिक बाईक शेअरींग' विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत उपयुक्त मॉडेलवर चर्चा करण्यात आली. यावेळी एनएसएसडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, इंटरनॅशनल अर्बन कॉर्पोरेशनचे वरिष्ठ विशेषज्ज्ञ निलाभ सिंह, इंटरनॅशनल अर्बन कॉर्पोरेशनचे भारतातील टिम लिडर पेनागोटिस करमनोस, आशीष वर्मा, उदीत जैन, गांधी यांच्यासह कार्ल्सरूह शहरातील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. एनएसएससीडीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागपूर शहरात राबविण्यात येणा-या स्मार्ट बायसिकल लेनबाबत माहिती दिली. शहरातील 3400 पैकी 400 किमी मार्गावर स्मार्ट सिटी अंतर्गत फक्त सायकल करीता वेगळे लेन तयार करण्यात येणार आहे.

जर्मनीतील कार्ल्सरूह शहरामध्ये बाईक सिस्टीम प्रकल्प यशस्वी ठरला. या शहराच्या अनुभवाचा नागपूर शहरासाठी उपयोग केला जाणार आहे. कार्ल्सरूह आणि नागपूर शहराद्वारे भविष्यात एकत्रित असेच प्रयत्न पुढे सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले. नागपूर शहरात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात पर्यावरणाच्या दृष्टीने बॅटरीवरील बसेस, ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. पूनापूर, भरतवाडा, पारडी, भांडेवाडी या क्षेत्राचा स्मार्ट सिटी अंतर्गत बाईक सिस्टीम प्रकल्प राबविण्याबाबत विशेष भर देण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. इंटरनॅशनल अर्बन कॉर्पोरेशनमध्ये नागपूरच्या भागीदारी अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Public Bike' in cooperation with Germany; East Nagpur Project