खुशखबर! आता वीज ग्राहकांची होणारी फसवणूक थांबणार, ‘वीज ग्राहकांचे हक्क’ पुस्तक प्रकाशित

योगेश बरवड
Monday, 5 October 2020

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीजनिर्मिती, पारेषण, वितरण व ग्राहक हक्क या क्षेत्रातील अभ्यासक आणि गेली २० वर्षे वीजग्राहकांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देणारे वीजतज्ञ प्रताप होगाडे ‘वीज ग्राहकांचे हक्क’ पुस्तकाचे लेखक आहेत. वीजग्राहकांच्या माहितीसाठी, हितासाठी व जागृतीसाठी ‘वीज ग्राहकांचे हक्क’ असल्याची त्यांची भावना आहे.

नागपूर : वीजबिलाबाबत बारकावे, अन्याय झाल्यास आक्षेप कसा नोंदवावा, एवढेच काय अधिकारांची जाणीवही सर्वसामान्यांना नसते. ही उणीव भरून काढणारा दस्तावेज पुस्तकरूपात तयार करण्यात आला आहे. अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देणारे ‘वीज ग्राहकांचे हक्क’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

सर्वसामान्य घरगुती, व्यावसायिक, शेतकरी व औद्योगिक या सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्ये व वीजचळवळीचे ज्ञान व्हावे, त्यांचे हक्क प्रस्थापित व्हावेत व त्यांना अन्यायाविरोधातील लढ्यासाठी प्रेरित करण्यास हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे.

हेही वाचा - एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीजनिर्मिती, पारेषण, वितरण व ग्राहक हक्क या क्षेत्रातील अभ्यासक आणि गेली २० वर्षे वीजग्राहकांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देणारे वीजतज्ञ प्रताप होगाडे ‘वीज ग्राहकांचे हक्क’ पुस्तकाचे लेखक आहेत. वीजग्राहकांच्या माहितीसाठी, हितासाठी व जागृतीसाठी ‘वीज ग्राहकांचे हक्क’ असल्याची त्यांची भावना आहे.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी इचलकरंजी येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आहे. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील सर्व वीजग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी वीजग्राहक संघटना कार्यरत असून या माहितीपूर्ण पुस्तकामुळे सर्व वीजग्राहकांना अधिक फायदा होईल. वीज ग्राहक जनतेसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणारे असल्याचे वीज क्षेत्रातील जाणकार मानतात.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

वीज ग्राहकांमध्ये जागरूकता नाही
घरगुती, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांमध्ये जागरूकता नाही. ती वाढायला हवी. अनेक नवीन गोष्टी वीज कायद्यात आल्या आहेत व काही नवीन येऊ घातल्या आहेत. त्याची माहिती वीज ग्राहकांच्या न्याय्य मागण्यासाठी चळवळ, प्रयत्न, जागरूकता आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची प्रेरणा देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
- प्रताप होगाडे,
अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Publication of electricity consumer rights book