पोलिसांनी असा रचला सापळा, आणि टाकली धाड...

huka_parlour
huka_parlour

नागपूर : अंबाझरी हद्दीत सुरू असलेल्या दोन हुक्का पार्लरवर अंबाझरी आणि गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून पाच जणांवर कारवाई केली. अंबाझरी ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांचे हुक्‍का पार्लरमालकांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने अंबाझरीतील हुक्‍का पार्लर बिनधास्त सुरू असतात, अशी पोलिस दलात चर्चा आहे.

पहिली कारवाई अंबाझरी पोलिसांनी लक्ष्मीभवन चौकातील मधुमाधव टॉवर येथील हुक्का पार्लरवर केली. मंगळवारच्या मध्यरात्री अंबाझरी पोलिसांना मधुमाधव टॉवर येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी या पार्लरवर छापा टाकला. या धाडीत हितेश विनोद आनंद चौधरी (28, अजनी रेल्वे वसाहत), अयान अहमद अब्दुल अन्सारी (20, सैफीनगर मोमिनपुरा) हे पोलिसांच्या हाती लागले. दोघेही रेस्टॉरेंटच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरविताना आढळले. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार करे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
दुसरी कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने केली. गोकुळपेठ येथील चांदूराम बेकरीच्या बाजूला एसीई कॅफे नावाचे रेस्टॉरेंट आहे. या रेस्टॉरेंटमध्ये रेस्टॉरेंटच्या नावाखाली हुक्का पार्लर चालतो, अशी माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. पोलिसांनी खात्री केली असता, खरोखरच हुक्का पार्लर सुरू असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरून धाडीची योजना आखून सोमवारी रात्री या रेस्टॉरंटवर छापा टाकण्यात आला. यात निखिल दिनेश मुथेरी (27) बरडे ले-आउट, बोरगाव, दीपेश गुलशनकुमार दासवानी (25) जरीपटका आणि व्यवस्थापक विक्कीसिंग जसबीरसिंग घटोडा पोलिसांच्या हाती लागले. तिघेही जण ग्राहकांना हुक्का पुरविताना दिसले. आरोपींच्या ताब्यातून वेगवेगळ्या हुक्का पॉटमध्ये वापरणारे फ्लेवरचे मिश्रण, तंबाखूजन्य फ्लेवर, तंबाखूची पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com