रेल्वेचे प्रतीक्षालय अन् विश्रामालय बंदच, प्रवाशांची गैरसोय

योगेश बरवड
Thursday, 19 November 2020

खबरदारीचा उपाय म्हणून स्थानकावरील वातानुकूलित ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहे. वातानुकूलित प्रतीक्षालये बंद आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावरील महिला प्रतीक्षालयसुद्धा बंदच आहे. सद्यःस्थितीत केवळ जनरल व आरक्षित अशी दोनच प्रतीक्षालये सुरू आहेत. महिला प्रतीक्षालयातच बाळाला दूध देण्यासाठी स्तनदा मातांची व्यवस्था आहे. पण, तेही बंद आहे. 

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील महिला व वातानुकूलित अशी दोन्ही प्रतीक्षालये बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय विश्रामालयही बंदच आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 

कोरोनामुळे २३ मार्चपासून नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुविधा लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. गाड्यांची संख्या वाढविण्यात येत असल्याने, रेल्वेच्या मुव्हमेंटचा टक्का ६०च्या वर गेला आहे. गाडी सुटण्याच्या दोन तासांपूर्वी प्रवाशांनी स्थानकावर पोहोचण्याचा आग्रह रेल्वेने धरला आहे. परिणामी रेल्वेस्थानकावरील गर्दीत भर पडली आहे. 

हेही वाचा - विदेशातील गुंतवणूक भोवली, राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर प्रहार

त्याचवेळी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानकावरील वातानुकूलित ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहे. वातानुकूलित प्रतीक्षालये बंद आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावरील महिला प्रतीक्षालयसुद्धा बंदच आहे. सद्यःस्थितीत केवळ जनरल व आरक्षित अशी दोनच प्रतीक्षालये सुरू आहेत. महिला प्रतीक्षालयातच बाळाला दूध देण्यासाठी स्तनदा मातांची व्यवस्था आहे. पण, तेही बंद आहे. 

हेही वाचा - ब्रेकिंग : नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना...

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता रेल्वेने क्वारंटाइन सेंटर तयार केले. त्यासाठी बेडची जुळवाजुळव करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावरील विश्रामालयातील बेडही हलविण्यात आले. आता बेडच नसल्याने विश्रामालयही सुरू करणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे प्रवाशांना सलग प्रवास करावा लागत आहे किंवा दुसऱ्या गाडीला वेळ असल्यास खासगी हॉटेलचा खर्च उचलावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway passengers faced problem because of waiting room is closed