
चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील बारा वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात आईसोबत गेली. डॉक्टरांच्या तपासणीत गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्याने सगळयांना धक्का बसला. पीडिता ही चार महिन्याची गर्भवती असून तिच्याच मैत्रीणीच्या बापाने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार, शेगाव (जि. चंद्रपूर) पोलिसांनी १४ मार्च रोजी आरोपी योगेश रामचंद्र दोहतरे (४०, रा. वहानगाव) विरोधात कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली होती.
नागपूर : मैत्रिणीच्या वडिलांनी केलेल्या अत्याचारात पाच महिन्यांची गर्भवती असणाऱ्या चिमूर तालुक्यातील (जि. चंद्रपूर) अल्पवयीन पिडितेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल करीत गर्भपात करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार, उच्च न्यायालयाने चंद्रपूर येथील अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय समिती गठीत करीत ७ एप्रिल रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
याचिकेनुसार, चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील बारा वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात आईसोबत गेली. डॉक्टरांच्या तपासणीत गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्याने सगळयांना धक्का बसला. पीडिता ही चार महिन्याची गर्भवती असून तिच्याच मैत्रीणीच्या बापाने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार, शेगाव (जि. चंद्रपूर) पोलिसांनी १४ मार्च रोजी आरोपी योगेश रामचंद्र दोहतरे (४०, रा. वहानगाव) विरोधात कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली होती.
आज पिडितेने नागपूर खंडीपीठामध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल करीत गर्भपात करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यामध्ये, गायनाकोलॉजिस्ट, रेजिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरॉलॉजिस्ट आणि पॅथलॉजिस्ट यांचा समावेश असेल. तर, यात दोन महिला डॉक्टर असतील, असेही नमूद केले.
या समितीला पीडितेची वैद्यकीय तपासणी करून मंगळवार (ता. ३) दुपारी ३ वाजेपर्यंत न्यायालयामध्ये अहवाल सादर करायचा आहे. पीडिता वकिलीची फीस देऊ शकत नसल्यामुळे विधी सेवा प्राधिकरणाने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ऍड. एस. एच. भाटिया यांची नियुक्ती केली. राज्य शासनातर्फे एन. एस. राव यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमुर्ती वी. एम. देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली.
- संचारबंदीत गडचिरोलीत नक्षलवादी सक्रिय
काय आहे प्रकरण?
शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वहानगाव (ता.चिमूर, जि.चंद्रपूर) येथील योगेश दोहतरे या चाळीस वर्षीय नराधमाच्या मुलीची सातव्या वर्गात शिकणारी मैत्रीण नेहमी घरी यायची. तिच्यावर या नराधमाची वासनांध नजर गेली. योगेश संधी मिळेल तेव्हा तिच्याशी लगट करायला लागला. जिवानिशी मारण्याची धमकी देत त्याने पीडितेवर पाच महिने लैंगिक अत्याचार केला. जिवाच्या भीतीने मुलगी अत्याचार सहन करीत होती. पोट दुखत असल्याने आईने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर १३ मार्च रोजी सदर प्रकरण उघडकीस आले.