Video : `झुंड'चे रियल नायक धावले `कोरोना'ग्रस्तांच्या मदतीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

नागराज मंजुळे यांच्या "झुंड' सिनेमाची खूपच चर्चा झाली. कोरोना संकटामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनावर संकट आले. या सिनेमाचे खरेखुरे नायक "झोपडपट्टी फुटबॉल'चे प्रणेते विजय बारसे मात्र कोरोना संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले.

नागपूर : विजय बारसे हे मुळचे भंडारा जिल्ह्यातले. नागपुरला त्यांनी "प्राध्यापकी' केली आणि इथेच त्यांनी "झोपडपट्टी फुटबॉल' ही अभिनव कल्पना साकारली. व्यसनांमध्ये लिप्त असलेल्या झोपडपट्टीतील तरुणांना त्यांनी "फुटबॉल' देत विधायक दिशने नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला जगभरातून गौरविले गेले. विजय बारसे यांची यंदा पंचाहात्तरी. अमृतमहोत्सवी वर्ष. "कोरोना'चे संकट नसते तर, त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे त्यांच्या हितचिंतकांचे नियोजन होते. परंतु "लॉकडाउन'मुळे ते शक्‍य झाले नाही. पंरतु, विजय बारसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त "कोरोना'ग्रस्तांसाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला.

 

 

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना ते आणि त्यांचे सुपूत्र भेटले आणि त्यांना तब्बल 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. तर पोलिस कर्मचाऱ्यांनाही मदत मिळावी, या हेतूने यांनी पोलिस आयुक्‍त भूषणकुमार उपाध्याय यांनाही 75 हजारांचा धनादेश दिला.

विजय बारसे यांची "क्रीडा विकास संस्था' आहे. नागपूर-कोराडी मार्गावरील बोखारा येथे संस्थेचे कार्य चालते. तिथे यद्ययावत भव्य पटांगण आहे. तिथे खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. "फुल ना फुलांची पाकळी म्हणून मी माझ्या वतीने मदत देत आहे', असे उद्गगार विजय बारसे यांनी धनादेश देताना काढले.

मास्क काढताच जिल्हाधिकारी हसले.. म्हणाले, `आरामात भेटू'

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून विजय बारसे यांना खास वेळ दिली होती. परंतु सामान्य देणगीदारांच्या रांगेने विजय बारसे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले. यावेळी त्यांचे चिरंजीव अभिजित बारसे हेही हजर होते. प्रारंभी विजय बारसे मास्क घालून होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ओळखले नाही. परंतु जरासा मास्क खाली सरकवताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ओळखले. दोघेही हसले. थोडा वेळ चर्चा केल्यावर "आपण आरामत भेटू' असे निमंत्रणही जिल्हाधिकाऱ्यांनी बारसे यांना दिले.

हे तर वाचाच- तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

आहे `ग्लमर' तरीही

"झोपडपट्टी फुलबॉल'मुळे विजय बारसे जगभर पोहोचले. तरी "झुंड' सिनेमात त्यांची भूमिका दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आणि नागराज मंजुळे सारख्या दमदार दिग्दर्शकाला त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा काढावासा वाटला तेव्हा त्यांनी विजय बारसे यांची आत्मकथा त्यासाठी निवडली. त्यामुळे विजय बारसे यांना प्रसिद्धीसोबतच "ग्लॅमर'ही प्राप्त झाले. परंतु, विजय बारसे यांचा वावर एखाद्या सामान्य माणसासारखाच असतो, हे पुन्हा एकवार त्यांच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्‍तांच्या भेटीतून जाणवले. कदाजित खरीखुरी मोठी माणसे अशीच तर राहात नसतील ना?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Real hero of Zund Movie raised hand for Corona affected patients