सात दिवसांत ७३ हजार कोरोना चाचण्यांचा विक्रम

केवल जीवनतारे
Monday, 8 March 2021

जिल्ह्यातील संसर्गाचा दर कमी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. सध्या हा दर दर १०.७५ टक्के आहे. विशेष असे की, कोरोना वाढत आहे त्याच तुलनेत मृत्यूचा टक्का देखील वाढतआहे. १ ते ७ मार्च या सात दिवसांत ५५ बाधितांचा झाला.

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होत आहे. सहा महिन्यांपूर्वी चाचण्यांचा आकडा अवघा सात ते आठ हजारांवर होता. मात्र फेब्रुवारी व मार्चमध्ये चाचण्यांचा वेग अतिशय वाढवण्यात आला आहे. १ ते ७ मार्च या काळात ७३ हजार ८७५ चाचण्यांचा विक्रम प्रशासनाने नोंदवला आहे. तर तब्बल ७ हजार ९४१ कोरोनाबाधित आढळून आले.

जिल्ह्यातील संसर्गाचा दर कमी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. सध्या हा दर दर १०.७५ टक्के आहे. विशेष असे की, कोरोना वाढत आहे त्याच तुलनेत मृत्यूचा टक्का देखील वाढतआहे. १ ते ७ मार्च या सात दिवसांत ५५ बाधितांचा झाला.

रविवारी शहरात ७ हजार ००८ व ग्रामीण भागामध्ये २ हजार ३४४ अशा ९ हजार ३५२ चाचण्या केल्या. यापैकी ग्रामीणमधून २३१, शहरातून १०३७ तर जिल्ह्याबाहेरील ३ असे १२७१ नवे कोरोनाबाधित आढळले. यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५७ हजार ७२९ वर पोहचली आहे.

जाणून घ्या - प्रेम एकीवर अन् साक्षगंध दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

आज दिवसभरात ग्रामीणमधील १, शहर व नागपूर जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी तीन अशा ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ४ हजार ३९० वर पोहचली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात १० हजार ८५० सक्रिय रुग्ण आहेत. यातील २ हजार ९०९ जणांना सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असल्याने ते शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ७ हजार ९४१ जण गृह विलगीकरणात आहेत. 

१० दिवसानंतर ११६० कोरोनामुक्त

गेल्या दहा दिवसानंतर प्रथमच आज रविवारी दिवसभरात १ हजार १६० जणांनी कोरोनावर मात केली. मागील सात दिवसांत ५ हजार ३०७ जण ठणठणीत होऊन घरीही परतले. तर आतापर्यंत कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ४२ हजार ४८९ वर पोहचली आहे. ९०.३४ टक्क्यांवर कोरोनामुक्तांचा दर पोहचला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record of 73000 corona tests in seven days