प्रेम एकीवर अन् साखरपुडा दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

The young man abused his married girlfriend Nagpur crime news
The young man abused his married girlfriend Nagpur crime news

नागपूर : ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. लग्न करेल तर तुझ्याशीच, अन्यथा आयुष्यभर अविवाहित राहणार,’ अशा आणाभाका घेणाऱ्या प्रियकराने दुसऱ्याच तरुणीशी गुपचूप साक्षगंध उरकले. ही माहिती मिळताच प्रेयसीने प्रियकराचे घर गाठत चांगलाच राडा केला. मात्र, त्याने लग्न करण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे तिने पोलिसात बलात्काराची आणि ‘धोका’ दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धोकेबाज प्रियकरासह अटक केली. नीलेश रामूजी गजबे (२८, रा. शंभूनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) हिचे २०१८ मध्ये शेजारी राहणारा नीलेश गजबे याच्यासोबत सूत जुळले. नीलेश हा नळ फिटिंगचे काम करीत होता. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

वस्तीत बोंबाबोंब झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे लग्न करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दबावाखाली रियाने आई-वडिलांनी शोधलेल्या युवकाशी लग्न केले. मात्र, नीलेशशिवाय ती संसाराची कल्पना करू शकत नव्हती.

दोघांनाही एकमेकांची आठवण येत होती. या दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकूण रियाच्या पतीला लागली. तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. तिला मारहाण करायला लागला. तिला होणारे दुःख लक्षात घेता नीलेशने तिला पतीला सोडून देण्याचा सल्ला दिला. पतीला सोडल्यानंतर आपण लग्न करू असे आमिष दाखवले.

त्यामुळे ती पतीला सोडून माहेरी आली. त्यामुळे तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पुन्हा नीलेशसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. नीलेशने कोरोनामुळे लग्न करण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता रिया लग्नासाठी तगादा लावायला लागली तर नीलेश तिला टाळू लागला.

नीलेशने केले साक्षगंध

नीलेशला नातेवाईक असलेली मुलगी आवडली. तिच्या वडिलांशी चर्चा करून लग्न जुळविले आणि त्याने लगेच साक्षगंध सुद्धा उरकून टाकले. लग्नाची तारीख देखील निघाली. लग्नाला आठवडा भराचा वेळ असतानाच नीलेशने ही माहिती रियाला दिली. ती चांगलीच संतापली. लगेच तिने कोराडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन नीलेशच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी नीलेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com