संचारबंदीचा असाही परिणाम... नागपूरच्या प्रदुषणात झाले हे बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur pollution

15 दिवसांपूर्वी शहरात तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण हवेच्या प्रत्येक घनमीटरमध्ये 66 मायक्रोग्रॅम इतके नोंदवण्यात आले होते. तेच प्रमाण गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली आहे. ते सरासरी 44 ते 39 मिलिग्रॅमपर्यंत खाली आलेले आहे. शहरातील बांधकामाची धूळ, वाहनांमधील प्रदूषण, कचरा जाळणे तसेच काही कारखान्यांमधील धुरामुळे हवा दूषित होते; मात्र गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणची बांधकामे बंद झाली असून, चार चाकी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.

संचारबंदीचा असाही परिणाम... नागपूरच्या प्रदुषणात झाले हे बदल

नागपूर : कोरोनामुळे उपराजधानीत चार दिवसांपासून अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपूर शहरातील प्रदूषणाच्या पातळीवर झाला आहे. शहरातील प्रदूषणाची पातळी गेल्या चार दिवसांत निम्म्याने खाली आले आहे. 

15 दिवसांपूर्वी शहरात तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण हवेच्या प्रत्येक घनमीटरमध्ये 66 मायक्रोग्रॅम इतके नोंदवण्यात आले होते. तेच प्रमाण गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली आहे. ते सरासरी 44 ते 39 मिलिग्रॅमपर्यंत खाली आलेले आहे. शहरातील बांधकामाची धूळ, वाहनांमधील प्रदूषण, कचरा जाळणे तसेच काही कारखान्यांमधील धुरामुळे हवा दूषित होते; मात्र गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणची बांधकामे बंद झाली असून, चार चाकी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तसेच कारखान्यांवरही नियंत्रण आल्याने प्रदूषणाच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतही घट 
नागपुरात दररोज पाच लाख लिटर पेट्रोल आणि एक लाख लिटर डिझेलची विक्री होत होती. त्यात 75 टक्के घट झालेली आहे. असे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले. 10 मार्च रोजी नागपुरातील हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण 66 मायक्रोग्रॅम होते. 

- संकटकाळातही ते जपताहेत माणुसकीचा धर्म

हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण (प्रत्येक घनमीटर हवेत) 
ठिकाण : मंगळवारी (मायक्रो ग्रॅम) - सोमवार (मायक्रो ग्रॅम) 
नागपूर : 39 - 44 
चंद्रपूर - 36- 81 
दिल्ली - 130-146 
नाशिक - 52-67 
पुणे - 49-83 
मुंबई - 42-70