esakal | पदवीधर निवडणूक : मागील निवडणुकीच्या तुलनेत ८१ हजार कमी; दोन लाख सहा हजार मतदारांची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

Registration of two lakh six thousand voters

यात एक लाख ९२ हजार ३१९ पुरुष तर ९५ हजार ९० महिला मतदार होत्या. यंदा हा आकडा दोन लाख सहा हजार ४५४ आहे. सर्वाधिक म्हणजे एक लाख दोन हजार ८०९ मतदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी १२,४४८ गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.

पदवीधर निवडणूक : मागील निवडणुकीच्या तुलनेत ८१ हजार कमी; दोन लाख सहा हजार मतदारांची नोंदणी

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. यासाठी नागपूर विभागात दोन लाख सहा हजार ४५४ पदवीधर मतदार नोंदणी झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत ८१ हजारने मतदार संख्या कमी झाली आहे.

निवडणूक आयोगाने मागील वेळेची मतदार रद्द करून नव्याने नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांनी मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. मागील निवडणुकीच्या वेळी दोन लाख ८८ हजार २२३ मतदार होते.

यात एक लाख ९२ हजार ३१९ पुरुष तर ९५ हजार ९० महिला मतदार होत्या. यंदा हा आकडा दोन लाख सहा हजार ४५४ आहे. सर्वाधिक म्हणजे एक लाख दोन हजार ८०९ मतदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी १२,४४८ गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.

क्लिक करा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला आहे भारी

असे आहेत एकूण मतदार

जिल्हा पुरुष महिला इतर जिल्ह्यातील मतदार
वर्धा १४०४५ ९०२० ०३ २३०६८
भंडारा १२४४० ५९९४ ०० १८४३४
गोंदिया ११३२४ ५६०० १० १६९३४
चंद्रपूर २२०३३ १०७२३ ०५ ३२७६१
गडचिरोली ९००७ ३४४० ०१ १२४४८
नागपूर ५६५२७ ४६२४७ ३५ १०२८०९
एकूण १२५३७६ ८१०२४ ५४ २०६४५४

संपादन - नीलेश डाखोरे 

go to top