esakal | फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला आहे भारी
sakal

बोलून बातमी शोधा

propel advance sl one weightless cycle in nagpur

कोरोनाच्या काळात तर सायकलिंग सर्वात जास्त फायदेशीर असल्याचे डॉक्टर सांगतात. या काळात देखील त्यांची सायकलिंग नित्यनेमाने सुरू आहे. त्यामुळे ते अगदी तंदुरुस्त आहेत. संदीप या सायकलवर इतकं प्रेम करतात की ही सायकल ते त्यांच्या बेडरुममध्ये पार्क करतात.

फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला आहे भारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आपल्यापैकी सर्वांनीच सायकल चालविली आहे. त्यामुळे सायकलचे वजन तर सर्वांनाच माहिती आहे. ज्यांनी चालवली नसेल त्यांनाही वजन माहिती असेलच. सायकल एका हातात सहज उचलणे शक्य नाही. पण, सुपर लाईट सायकलबद्दल तुम्ही ऐकलंय का?  होय, ही सायकल फक्त दोन बोटांनी सहज उचलता येते. ही सायकल महागही तितकीच आहे. तिची किंमत ५ लाख ७० हजार रुपये आहे.  

हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणूक : संदीप जोशींसह सात उमेदवारांची माघार, 19 जण रिंगणात

संदीप जवंजाळ यांची ही सायकल आहे. संदीप हे बेरार फायनान्सचे एक्सीक्युटीव्ह डायरेक्टर आहेत. त्यांना लहानपणापासून वाहनांची आवड आहे. तसेच ते दररोज सायकलींग देखील करतात. संदीप लहानपणी सायकलिंग करताना तुम्ही आम्ही जी सायकल वापरली तिच सामान्य सायकल वापरत होते. मात्र, त्यांची सायकलिंगची क्षमता वाढत गेली. त्यामुळे त्यांनी प्रोफेशनल सायकल वापरायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेवरून 'ट्रेक वन पॉईंट वन' ही सायकल खरेदी केली. आता नवीन सायकल घ्यायची म्हणून त्यांनी तैवानवरून विशेष कार्बन फायबरची 'प्रोपेल अ‌ॅडव्हान्स एसएल वन' ही सुपर लाईट सायकल तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांना विकत घेतली.

हेही वाचा - जेईई मेन्स परीक्षा कधी? 'एनटीए'कडून अद्याप घोषणा नाहीच

गेल्या एक महिन्यापासून संदीप ही महागडी सायकल वापरत आहेत. दररोज किमान 25 किलोमीटर आणि आठवड्याच्या शेवटी सोलो राईड करत नागपूरच्या अवतीभवती 150 किलोमीटर पर्यंत सायकलिंग करतात. कोरोनाच्या काळात तर सायकलिंग सर्वात जास्त फायदेशीर असल्याचे डॉक्टर सांगतात. या काळात देखील त्यांची सायकलिंग नित्यनेमाने सुरू आहे. त्यामुळे ते अगदी तंदुरुस्त आहेत. संदीप या सायकलवर इतकं प्रेम करतात की ही सायकल ते त्यांच्या बेडरुममध्ये पार्क करतात. 

हेही वाचा - कारवाई होऊनही 'जनाहार'मध्ये सुधारणा नाहीच, आता तर चक्क बनवले गोडावून; गरीब प्रवाशांनी...

या सायकलची वैशिष्ट्ये -

  • कार्बन फायबर बॉडी
  • वजन फक्त सात किलो
  • ट्युबलेस टायर विथ ऑटो पंक्चर रिपेअर
  • खास ट्युबलेस टायरमध्ये 125 पीएसआय म्हणजेच बाईकच्या टायरपेक्षा चारपट अधिक हवा राहते.
  • सुपर लाईट सायकलमध्ये विशेष सेन्सर बेस्ड गियर सिस्टीम लागली आहे.
  • मागच्या चाकाला 10 आणि समोरच्या चाकाला 2, असे एकूण 12 गियर्स
  • प्रोफेशनल सायकलपटू या सायकलवर सहज 60 ते 70 किमी प्रति तासाची गती
  • सिंगल मोल्ड सायकल. म्हणजेच, सायकलमध्ये कुठेच जॉईन्ट नाहीत.