esakal | "बिल भरा अन्यथा मृतदेह देणार नाही" रुग्णालयानं मागणी करताच नातेवाइकांचा राडा; केली तोडफोड   

बोलून बातमी शोधा

relatives of dead patient damaged hospital as demand for money in Nagpur

सूत्रांच्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी संगीता समुन्द्रे नावाच्या ४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी त्याच दिवशी व्हिनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे भरती केले होते

"बिल भरा अन्यथा मृतदेह देणार नाही" रुग्णालयानं मागणी करताच नातेवाइकांचा राडा; केली तोडफोड   
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः उपचारादरम्यान महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी छावणी येथील व्हिनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे तोडफोड केली. ही घटना आज दुपारी घडली.

'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;...

सूत्रांच्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी संगीता समुन्द्रे नावाच्या ४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी त्याच दिवशी व्हिनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे भरती केले होते. दवाखान्यात भरती करतेवेळी १५ हजार रुपये डिपॉझिट केले होते. महिलेवर उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी महिलेचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी महिलेचा मृतदेह मागितला असता डॉक्टरांनी मृतदेह देण्यास नकार दिला. 

उपचाराचे बिल भरा अन्यथा मृतदेह देणार नाही, अशी भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने घेतली. त्यानंतर मृतदेह मनपाच्या ताब्यात देण्यात येईल असे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. नातेवाइकांनी दवाखान्यावर दगडफेक करून काऊंटरच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

संशयावरून पत्नीच्या बॉसवर चाकूहल्ला; प्रेयसीचा काढले...

 हॉस्पिटल प्रशासनाने सदर पोलिसांना ही माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. दरम्यान, व्हिनस हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची तर कुणी करंट लागल्याने मृत्यू झाल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरविली होती. आग किंवा करंट लागल्याने कुणाचाही मृत्यू झाला नसून कोरोनामुळे सदर रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संपादन - अथर्व महांकाळ