शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असताना सावनेर येथील बळीराजांना उत्पनातून दिलासा

मनोहर घोळसे
Sunday, 15 November 2020

शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणामुळे पीक नुकसानीची होणारी आर्थिक कोंडी टाळण्यासाठी पारंपरिक शेती न करता नवनव्या पिकांचा प्रयोग करणे गरजेचे आहे. यातूनच आर्थिक प्रगती साधता येते, असे मत तालुक्यातील तुळशीदास पाटील व उत्तम कापसे या प्रयोगशील शेतकऱ्‍यांनी व्यक्त केले आहे.

सावनेर (जि. नागपूर) : कधी पावसाचा दुष्काळ. कधी अति पाऊस पडला की पिकांचे नुकसान. तर कधी बदलते हवामान. यामुळे तालुक्यातील सोयाबीन, मका, तूर, कपाशी आदी पिकांसोबतच फळ शेतीचेही बरेच नुकसान झाले. मात्र, कोरोना काळात संत्रा व मोसंबीला मिळालेल्या भावामुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे सावनेर येथील संत्रा उत्पादक शेतकरी उत्तम कापसे व नंदापूर येथील मोसंबी उत्पादक शेतकरी तुळशीदास पाटील सांगतात.

यंदा सोयाबीन उत्पादन तोंडावर येताच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले. बदलत्या वातावरणामुळे मोसबी आंबिया बहाराच्या संत्र्याची गळ झाली. शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणामुळे पीक नुकसानीची होणारी आर्थिक कोंडी टाळण्यासाठी पारंपरिक शेती न करता नवनव्या पिकांचा प्रयोग करणे गरजेचे आहे. यातूनच आर्थिक प्रगती साधता येते, असे मत तालुक्यातील तुळशीदास पाटील व उत्तम कापसे या प्रयोगशील शेतकऱ्‍यांनी व्यक्त केले आहे.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

यंदा तालुक्यात ३,०६५ हेक्‍टर क्षेत्र संत्रा मोसंबीच्या लागवडीखाली असून, १,८६५ हेक्‍टर उत्पादन क्षेत्र आहे. आंबिया बहारातील संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. मात्र, गळतीच्या प्रमाणामुळे थोडीफार उत्पादनात घट झाली. तरीसुद्धा संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

उत्पादन चांगले व भाव समाधानकारक

संत्रा उत्पादनासाठी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होत असल्याने संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीला तोंड देत आहेत. मात्र, यंदाच्या हंगामातील आंबिया बहराचे संत्रा व मोसंबीचे उत्पादन चांगले झाल्याने व समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief for orange and citrus growers