निकाल वाढल्याने पदवींची संख्या वाढली; विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा एप्रिल महिन्यात 

मंगेश गोमासे 
Thursday, 21 January 2021

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. पदवी आणि पदव्युत्तर विभागाचे निकाल विक्रमी लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा निकालात यंदा भरघोस वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर्षी पदवींची संख्या वीस टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार विद्यापीठाद्वारे १०८ वा दीक्षान्त सोहळा एप्रिल महिन्यात करण्याच्या दृष्टीने सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप तारखेची अधिकृत घोषणा मात्र केली नाही. 

हेही वाचा - भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. पदवी आणि पदव्युत्तर विभागाचे निकाल विक्रमी लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे. अनेक विषयांचे निकाल ९९ टक्क्यांच्या घरात आहेत. परिणामी यंदा सन्मानित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही निश्चितच दरवर्षीपेक्षा अधिक राहणार आहे. २०२० च्या १०७ व्या दीक्षान्त सोहळ्यात विद्यापीठाने एकूण ६४ हजार २४१ पदव्या प्रदान केल्या होत्या. यंदा विद्यापीठाने २०३ अभ्यासक्रमांच्या अंतिम सेमिस्टरच्याच परीक्षा घेतल्या. त्यात ६६ हजार ९९७ विद्यार्थी सहभागी झाले होते. 

असे लागले निकाल 

नागपूर विद्यापीठाच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑनलाइन परीक्षेत अभूतपूर्व निकाल लागले. मागील सत्रात विद्यापीठाने २०३ अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली. ज्यामध्ये एकूण ६६,९९७ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी केवळ ९५३ उमेदवार अपयशी ठरले. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना कधी ४० ते ५० टक्क्यांहून अधिक गुण घेणेही अवघड होते त्यांनी ९० ते ९५ टक्के गुण मिळवले आहेत. 

हेही वाचा - आता हेच बाकी होतं! नागपूर मेट्रोत प्री-वेडींग, वाढदिवस...

सरन्यायाधीश बोबडे यांचा सन्मान 

नागपूर विद्यापीठाने सरन्यायाधीश शरद बोबडे यांना डी. लिट किंवा एलएलडीची मानद पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅनेजमेंट कौन्सिलने यासंदर्भात प्रस्तावही मंजूर केला आहे. आता सिनेटच्या मंजुरीची गरज असल्याने विशेष सभा घेण्याचीही तयारी करण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Result of RTMNU increased this year