यापूर्वीही पुण्यातील १९ नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देतील, अशीही चर्चा रंगली होती. त्यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
वर्धा : भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ यासारख्या प्रत्येक ठिकाणचे भाजपचे नेते आमच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आज ते वर्धा येथे बोलत होते.
हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा
यापूर्वीही पुण्यातील १९ नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देतील, अशीही चर्चा रंगली होती. त्यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून फक्त वातावरणनिर्मितीसाठी असे वक्तव्य केले जात आहे. भाजपचे कार्यकर्ते भाजपसोबत एकनिष्ठ आहेत. त्यामुळे एकही भाजपचा कार्यकर्ता सोडून जाणार नाही. आता अनिल देशमुखांनी याबाबत वक्तव्य केले आहे. मात्र, त्यांचे वक्तव्य किती खरे ठरते, हे येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.