esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाइन प्रत
sakal

बोलून बातमी शोधा

online

ऑनलाइन शिक्षणाप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यांना उत्तरपत्रिकांची ऑनलाइन प्रत देण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाइन प्रत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाने जगाला अधिक व्हर्च्युअल केले आहे. कोरोनाचे संकट आल्यापासून मंत्र्यांपासून ते राजकारणी, व्यावसायिक, नोकरदार आणि नातेवाईकही व्हिडिओ कॉन्फरंसिंगवर मीटिंग घेतात. शैक्षणिक वर्गही ऑनलाईन होतात. यातीलच पुढचे पाऊल म्हणजे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरमुल्यांकनासाठी अर्जही ऑनलाईनच करता येणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यांना उत्तरपत्रिकांची ऑनलाइन प्रत देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरानाचे रुग्ण आढळल्यावर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. याशिवाय उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे नियोजन बिघडले. अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका पोस्ट ऑफिसमध्येच पडल्या असल्याचे चित्र होते. याशिवाय टाळेबंदीमुळे दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाचे वेळापत्रक कोलमडले आहे.

बारावीची परीक्षा संपून उत्तरपत्रिका या नियमकांकडे असता टाळेबंदी लागू झाल्याने निकालाची प्रक्रिया लांबली आहे. नागपूर, अमरावतीसह काही शिक्षण मंडळाचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असले तरी मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या बघता तेथील मूल्यांकन रखडल्याने यंदा निकालही लांबला आहे. मात्र, शिक्षण मंडळाच्या वतीने निकाल आणि त्यानंतरच्या प्रक्रियांसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा - नागपुरातील मानकापूर, पारडी, दिघोरी अजनीतील परिसर प्रतिबंधित, वाचा सविस्तर...

15 जुलैला बारावीचा निकाल येण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यानंतरची प्रक्रिया म्हणजे फेरमूल्यांकनासाठी आवश्‍यक असलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा बोर्डाकडून देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकनाचे निरीक्षण करता येणार आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियामधील शिक्षणाधिकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत.