सर्वसामान्य गृहिणी ते यशस्वी बिल्डर, विदर्भातील पहिली बांधकाम व्यावसायिक ठरलेली महिला आहे तरी कोण?

rita potpose first woman builders in vidarbha
rita potpose first woman builders in vidarbha

नागपूर : सध्याच्या काळात बांधकाम क्षेत्रावर पुरुषांचे वर्चस्व पाहायला मिळतेय. मात्र, 'घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी' हा धागा सांभाळून नागपुरातील एका महिलेने बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. काहीतरी वेगळे करायचे या जिद्दीतून त्या विदर्भातील पहिल्या महिला बांधकाम व्यावसायिक ठरल्या आहेत. ही प्रेरणादायी कहाणी आहे, रिता भास्कर पोटपोसे यांची...

बांधकाम क्षेत्राचा अनुभव नसताना ठरवूनच या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. न घाबरता जिद्दीने आव्हानांना पुढे गेल्या. तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी आर्किटेक्टर आणि एमबीएचे शिक्षण घेतले. कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सर्वच आव्हानाला पेलण्याची जिद्द निर्माण झाली. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्याने लग्न करून संसार सांभाळणे याच मानसिकतेतून रिताचा विवाह १९९१ साली भास्कर यांच्यासोबत झाला. 

पतीचे शुगर टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण असल्याने त्यांना एका साखर कारखान्यात अल्प पगारावर नोकरी मिळाली. नोकरीमुळे बदल्याच्या ठिकाणीच लहान-मोठ्या गावात राहावे लागायचे. गृहिणी म्हणून यशस्वी संसार सांभाळताना तिच्या मनात स्वतःचे काहीतरी करण्याची जिद्द कायम होती. नागपुरात शिवणकलेचे एक दिवस शिक्षण घेतले आणि दुसऱ्याच दिवसापासून रिताने स्वतःच शिवणकलेच्या प्रशिक्षण वर्गास सुरुवात केली. मात्र, वेगळे काहीतरी करण्याची मनातील इच्छा रिताला सतत अस्वस्थ करीत होती. 

रिताने आर्किटेक्टरचे शिक्षणही पूर्ण केलेले होते. त्याच्या जोरावर अनुभव पाठीशी नसताना नरेंद्र नगरात जागा खरेदी करून २००८ साली फ्लॅटस्किमचे काम सुरू केले. मुलगी शेफाली हिच्या नावाने कंस्ट्रक्शन कंपनी सुरू केली. पहिलाच प्रकल्प काही वैयक्तीक कारणांमुळे अडचणीत आला. मात्र, आत्मविश्‍वासने उभ्या झाल्या. सासुबाईच्या नावाने 'यशोदा' अपार्टमेन्ट हा पहिला प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. 

ओंकार नगरातील दुसऱ्या प्रकल्पाच्या बांधकामाच्या वेळीही अनेक अडचणी आल्यात. काही दिवस 'डिप्रेशन'मध्येही गेले. त्या काळाच पती आणि मुलगी शेफालीची साथ मिळाली. आईच्या नावाने 'कुसुम' अपार्टमेन्ट हा दुसरा प्रकल्प सुरू केला. फ्लॅट स्किमजवळ फलक लावल्यानंतर त्यावरील मोबाईल क्रमांकावर फ्लॅट खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून विचारणा होत होती. तेव्हा रिताने मोबाईल उचलल्यावर भाऊ अथवा साहेब नाहीत का? असा प्रति प्रश्‍न केला जात होता. त्यामुळे मला प्रारंभी आश्‍चर्य वाटत होते. रिता त्यांची विचारपूस करीत आणि मीच त्या फ्लॅट स्किमचे काम पाहते, असे सांगितल्यावरही त्यांचा विश्‍वास बसत नव्हता. परंतु, हळूहळू जम बसल्याचे त्या सांगतात. 

आतापर्यंत पाच स्कीम पूर्ण -

महिला बांधकाम क्षेत्रात आल्याचे कळल्यावर अनेकदा धमक्यांचे फोन येत होते. काही दिवस घाबरले. कुटुंबीयांकडून बळ मिळाले. त्यामुळे व्यवसाय सुरूच ठेवला. आतापर्यंत पाच ते सहा स्कीम पूर्ण झाल्या आहेत. सर्वच फ्लॅट स्कीमला जानकी, शंकुतला आणि कृतिका, अशी महिलांची नावे द्यायची ठरवले आहे. 
- रिता पोटपोसे, बांधकाम व्यावसायिक

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com