esakal | अजबच ना! वयाच्या १८ व्या वर्षी केली चोरी आणि ६२ व्या वर्षी झाली अटक

बोलून बातमी शोधा

robbed at the age of 18 and arrested at the age of 62 Nagpur crime news}

विचारपूस केली असता फार वर्षांपूर्वी त्याने व त्याचा सहआरोपी मित्र नारायण शंकर यादवराव नेवारे व अशोक केशवरा टेकाम यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यात अंबाझरी पोलिसांनी अटक केली होती.

अजबच ना! वयाच्या १८ व्या वर्षी केली चोरी आणि ६२ व्या वर्षी झाली अटक
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : वयाच्या १८व्या वर्षी घरफोडी केली आणि वयाच्या ६२व्या वर्षी पोलिसांच्या हाती लागला. त्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले. तर घरफोडीतील सहकाऱ्याचा वृद्धपकाळामुळे मृत्यू झाला. लक्ष्मण शामराव बोबडे (वय ६२) असे आरोपीचे नाव आहे.

लक्ष्मण १८ वर्षांचा असताना त्याने घरफोडी केली होती. त्याच्यावर अंबाझरी पोलिस ठाण्यात १९७७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयाने त्याला अटक करण्याचे आदेश जारी केले होते. विशेष शोध पथकाने लक्ष्मण बोबडे याचा शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयाकडून तो राहत असलेल्या आवारी चौक, विदर्भ बुनियादी शाळेच्या समोर, वकीलपेठ, नागपूर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.

अधिक वाचा - खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी

त्याची विचारपूस केली असता फार वर्षांपूर्वी त्याने व त्याचा सहआरोपी मित्र नारायण शंकर यादवराव नेवारे व अशोक केशवरा टेकाम यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यात अंबाझरी पोलिसांनी अटक केली होती.

आरोपी लक्ष्मण बोबडेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सहआरोपी अशोक केशवराव टेकाम याचा सुध्दा शोध घेतला असता तो १९९९ मध्ये मरण पावल्याचे कळले. पोलिसांनी त्याचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त केले आणि आरोपी लक्ष्मण बोबडे याला पुढील कारवाईकरीता ३ मार्च रोजी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.