निर्जंतुकीकरणासाठी रोबोट तंत्रज्ञान उपयुक्त

केवल जीवनतारे
Friday, 6 November 2020

सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला आहे. त्याचे  ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत पार पडले.

नागपूर : नुकतेच युव्ही-३६० अंशांचे सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) तयार विकसित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यास रोबोट तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...

शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 'युव्ही - ३६० डिग्री सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा)'चे गुरूवारी डॉ. राऊत यांच्या हस्ते ई- उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे, शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे, युट्रोनिक्स टेक्नॉलॉजिस प्रा. लि. चे संचालक रत्नदीप कांबळे आदी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला आहे. त्याचे  ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी. शिर्के, प्रा. महेंद्र शिरसाठ, अमित किमटकर, सुबोध भालेराव व संबंधित उपस्थित होते.

रोबोटची वैशिष्ट्ये 
रोबोटमध्ये वेगवेगळे सेन्सर्स वापरले आहे. 
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे. 
किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी पीआयआर सेन्सरचा वापर 
खोलीत रोबोट फिरताना अडथळ्यांवर मात करण्यासाठी अँटीकोलिजन सेन्सरचा वापर 
रोबोटमध्ये ३६० अंश स्कॅनरचा वापर
२० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची  खोली अवघ्या ५ मिनिटात निर्जंतुक करण्याची  क्षमता

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robot technology useful for disinfection