esakal | चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...
sakal

बोलून बातमी शोधा

coloured cotton will be game changer

या कपाशीपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांपासून (फायबर) थेट रंगीत वस्त्र बनविता येणे शक्य होणार आहे.

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

sakal_logo
By
प्रशांत राॅय

नागपूर : ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, या बालगीतात सशाला पांढऱ्याशुभ्र कापसाची उपमा देण्यात आली आहे. खरं म्हणजे कापूस आणि शुभ्र पांढरा रंग यांचे नातेच अतूट. कापसाला पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त दुसरा कोणताच रंग नाही हे आपल्या मनात ठासून भरलेलं. आता मात्र या धारणेला तडा जाणार आहे. लवकरच लाल, सोनेरी आणि जांभळा कापूस शेतशिवारात डोलताना दिसला तर नवल वाटायला नको. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था, सीएसआयआरओच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधकांनी जनुकीयदृष्ट्या सुधारित (जीएम) कापूस विकसित करण्यात यश मिळविले आहे. डॉ. कॉलिन मॅकमिलन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत कपाशीचे रंगीत उती (कलर्ड टिश्यू) तयार केले आहेत. पुढील काही महिन्यांत संशोधक या उतींद्वारे नवीन कपाशीची नियंत्रित वातावरणात लागवड करणार आहेत.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

ही कपाशी पुनरुत्पादन करण्यास सक्षम राहणार आहे. या कपाशीपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांपासून (फायबर) थेट रंगीत वस्त्र बनविता येणे शक्य होणार आहे. या वस्त्रांना अन्य कोणत्याही प्रकारे रंगरंगोटी (डाय) करण्याची गरज भासणार नसल्याचा या संशोधकांचा दावा आहे. एकूणच काय तर यापुढे थेट रंगीत कापड तयार मिळणार आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये हा कापूस आगामी काळात गेम चेंजर ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

इको-फ्रेंडली, पाण्याचीही बचत 
भारत आणि चीनमध्ये कृत्रिमपणे रंग तयार केले जातात. यासाठी लाखो गॅलन पाणी लागते. तसेच मजुरांना त्वचाविकार, कॅन्सर, पोटाचे विकार, दमा आदी रोगांचाही सामना करावा लागतो. कापडाला रंगरंगोटी (डाइंग) करण्यासाठी जे रसायन वापरले जातात. यामुळे भूजलाचेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. ऑस्ट्रेलियात विकसित करण्यात येत असलेल्या या कपाशीमुळे रंगरंगोटी करण्याची गरज भासणार नसून पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे येथील संशोधकांचे म्हणणे आहे. 

कापसाच्या डीएनएमध्ये रंगीत जनुके 
सीएसआयआरओ विविध रंगांचा कापूस विकसित करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. संशोधकांनी कापसाच्या डीएनएमध्ये रंगीत जनुके (कलर्ड जीन) टाकली आहेत. यामुळे कापसाच्या पेशी नैसर्गिकरीत्या पांढऱ्या होण्याऐवजी विविध रंगांची प्रतिलिपी करण्यास सुरुवात करतात. आत्तापर्यंत त्यांनी लाल, सोनेरी आणि जांभळ्यासह काही भिन्न रंग तयार केले आहेत. संशोधकांची पुढची पायरी म्हणजे त्यांना रंगीत कापसाचे बियाणे तयार होतील की नाही हे पाहायचे आहे. या सर्व प्रयोगानंतर रंगीत कापसाचे पूर्णपणे नवीन रोपे तयार होतील, अशी अपेक्षा या संशोधकांची आहे. 

कापूस उत्पादकांना संधी? 
विदर्भासह महाराष्ट्र कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. पांढरा कापूस काळवंडतो किंवा प्रत खराब होण्याची समस्या आहे. रंगीत कापसामुळे ही समस्या दूर होऊन जास्त किमतीत हा कापूस विक्री होईल, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर अद्याप हा प्रयोग प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे याविषयी सध्याच काही बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी दिली. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 

go to top