लोकल बॉयने तयार केले 'रोस्टेल' ॲप, ग्राहकांना घरपोच साहित्य

Rostel app created by Roshan Shivankar
Rostel app created by Roshan Shivankar

नागपूर  : ग्राहकांना जलद, दर्जेदार, सुरक्षित, कमी वेळेत आणि परवडेल त्या भावात वस्तू मिळाल्या पाहिजेत म्हणूनच ग्राहकांच्या आवडी-निवडी जपून त्यांच्या मनातील वस्तू त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर कशाप्रकारे पोहचविता येतील या सर्व गोष्टीचा विचार करून रोशन शिवणकर या युवकाने ‘रोस्टल’ ॲपच्या माध्यमातून शहरातील पहिले ‘शॉप बेस्ड हायब्रिड ई कॉमर्स मार्केट' सुरू केले आहे़.

धावपळीच्या जीवनात प्रत्येक काम झटपट व्हावे अशी अपेक्षा असते. त्यामुळेच मोबाईल उचलून ऑनलाइन शॉपिंग करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षापासून सुरू झाला आहे. आवडीच्या वस्तू घेण्यासोबतच आता ग्राहक किरकोळ सामान आणि किराणा खरेदीही ऑनलाइन करू लागले आहे. लॉकडाउनच्या काळात तर सोशल डिस्टंन्सिंग पाळून सामान खरेदी करणे कठीण झाले होते. मात्र, रोशन शिवणकर या तरुणाने हीच बाब हेरून ग्राहकांना घरपोच किरकोळ सामान देण्यासाठी 'रोस्टेल' हे ॲप विकसित केले. 

त्यातून शेकडो दुकानांना जोडले. ॲपद्वारे डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने वस्तूंची खरेदी विक्री करीत व्यवसायास सुरुवात केली. या ॲपला जवळपास पाच हजारावर नागरिकांनी डाउनलोड केले आहे. आज दररोज किमान १२ ते १५ ग्राहकांचे ऑनलाइन ऑर्डर स्वीकारुन ते घरी पोहचविण्याचे काम त्याच्या ॲपद्वारे केल्या जाते. केवळ ग्राहकच नव्हे तर छोट्या मोठ्या दुकादारांनाही सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कंपनीमार्फत केल्या जाते. यातून किमान १० ते १५ युवकांना त्याने रोजगारही दिला आहे.
 

लॉकडाउनच्या काळातील बंद दुकाने झाली सुरू

मार्च महिन्यापासून लागलेल्या लॉकडाउनमुळे अनेक दुकाने बंद झालीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. मात्र, रोस्टेल मुळे ही बंद दुकाने पुन्हा ऑनलाइन सुरू झाली. याशिवाय त्याद्वारे ग्राहकांनाही वेळेत सामान मिळू लागले. ‘रोस्टल'ने आपल्या ग्राहकांसाठी ५ टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत विशेष सूट देण्यात येते.

संपादन  : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com