सोन्याला झळाळी  लग्नाचा डबल धमाका

राजेश रामपूरकर
Sunday, 18 October 2020

दसरा, दिवाळी आणि पुढील लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहक दिसू लागले आहेत. दरवर्षी नवरात्रीपासून सोन्याच्या मागणीला वाढ होत असते. यंदाही तोच ट्रेंड पाहायला मिळत असला तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या मागणीत २५ टक्के वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण असून युरोपामधील काही देशांमध्ये पुन्हा टाळेबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. युरोपामध्ये टाळेबंदी झाल्यास सोने-चांदीच्या दराचा आलेख चढेल असे संकेत तज्ज्ञांनी दिलेले आहेत. 

नागपूर : नवरात्रोत्सव सुरू झाला असून सोन्यांच्या दरही ५२ हजाराच्या आसपास असल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. अनलॉकमध्ये लग्न सोहळ्यांना परवानगी मिळू लागली आहे. त्यामुळे वधू-वर पक्षांना लग्नासाठी दागिने खरेदीचे वेध ग्राहकांना लागल्याने ग्राहकांची पावले दुकानाकडे वळू लागले आहेत. 

दसरा, दिवाळी आणि पुढील लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहक दिसू लागले आहेत. दरवर्षी नवरात्रीपासून सोन्याच्या मागणीला वाढ होत असते. यंदाही तोच ट्रेंड पाहायला मिळत असला तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या मागणीत २५ टक्के वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण असून युरोपामधील काही देशांमध्ये पुन्हा टाळेबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. युरोपामध्ये टाळेबंदी झाल्यास सोने-चांदीच्या दराचा आलेख चढेल असे संकेत तज्ज्ञांनी दिलेले आहेत. 

विद्यापीठाचे ‘मिशन काश्मीर' यशस्वी; राजस्थान, हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी दिला विद्यापीठाचा पेपर

उन्हाळ्यात थांबलेले लग्न आणि डिसेंबरमध्ये होणारे लग्न असा लग्नाचा डबल धमाका लक्षात घेता सोन्याची मागणी वाढणार आहे. तसेच दर वाढतील अशी शक्यता आहे. दहा ग्रॅमवर गेलेले सोने ५१ हजारांच्यावर स्थिरावले असून चांदी प्रति किलो ६२ हजारांवर आहे. सोने ६० हजाराचा आकडा पार करेल असेही बोलले जात आहे. 

सोन्याची मागणी वाढणार

नवरात्रोत्सवात सोन्याच्या खरेदीला वेग आला आहे. दसरा, दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहकांची गर्दी वाढून दागिन्यांच्या मागणीत वाढ होईल. डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्न समारंभानिमित्त सोन्याची मागणी वाढणार आहे. 
राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rush in Gold Market on the occasions of festivals