सॅनिटायझरमुळे तुम्हालाही होतोय त्रास? करा हे उपाय

hand wash
hand wash

नागपूर : एरवी त्वचेच्या सौंदर्यासाठी जागरुक असलेली मंडळी कोरोनाच्या काळात हतबल झाली आहे. हातांची त्वचा मऊ मुलायम ठेवण्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणारे आता केवळ सॅनिटायझर वापरत आहेत.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने मास्क, सॅनिटायझर हे दैनंदिन व्यवहारातील परवलीचे शब्द बनले आहेत. अनेकांना हातांना सॅनिटायझर लावल्यानंतर त्रास जाणवतो आहे. संवेदनशील त्वचा असलेल्यांना तर काय करावे हा प्रश्न पडला आहे.
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. अल्कोहोल हे शीघ्र ज्वलनशिल आहे. स्ट्रॉंग सॅनिटायझर बूचभर जमिनीवर टाकून बघावे आणि त्यावर टिश्‍यूपेपर धरावा. टिश्‍यूपेपर पेट घेतो. सॅनिटायझर बाटलीतून बाहेर काढताच त्यातून सुक्ष्म जाळ सुरू होतो. हा जाळ डोळ्यांना दिसत नाही. तो अदृश्‍य स्वरूपाचा असतो. मात्र तो कागद पेटवू शकतो. तो त्वचेचे काय हाल करीत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

अनेकांची त्वचा नितळ असते. अनेकांच्या त्वचेचा पोत इतरांच्या तुलनेत पातळ असतो. अशांना सॅनिटायझरचे साईड इफेक्‍टस्‌ अधिक येतात. ज्यांना आधीच "सनबर्न' चा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर "सॅनिटायझर' म्हणजे मोठे संकट आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "सॅनिटायझर' शिवाय दुसरा पर्याय नाही. साबणाने हात धुवून मानसिक समाधान मिळत नाही. तेव्हा त्वचेचा त्रास असलेल्यांनीच नव्हे तर असा त्रास नसलेल्यांनीही त्वचेच्या रक्षणासाठी वरीलप्रमाणे उपाययोजना करावी, असे या त्वचारोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्वचेच्या या समस्या वाढल्या
हाताला खाज येणे, पांढरे चट्टे उठणे आणि हात लाल होणे अशा त्वचाविषयक तक्रारी वाढल्या असल्याचे निरीक्षण त्वचारोगतज्ज्ञ यांनी नोंदविले आहे. सतत हात धुणे हा प्रतिबंधात्मक उपायामधील एक प्रमुख उपाय आहे.
एकदा सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर त्याचा प्रभाव दोन ते तीन तास राहू शकतो. सतत जंतुनाशक अथवा साबण हाताला लावल्याने त्वचेचा पहिला नाजूक संरक्षक थर कमकुवत होत असून त्वचारोगाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
सॅनिटायझरच्या वापरामुळे तो जीवाणू मरत नाही, तर त्या जीवाणूची वाढ रोखली जाते.

वारंवार सॅनिटायझरचा वापर केल्याने खाज येणे, आग होणे, हात लाल होणे असे त्वचाविकार उद्धभवू शकतात.
सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे गजकर्ण, त्वचा कॅन्सर तसेच पेशींवरही परिणाम होतो.

सॅनिटायझरऐवजी शक्‍यतो साबणाचा वापर करावा.
ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध होऊ शकत नसेल त्यावेळी त्याचा वापर करावा.
सध्या अनेक महिला बाजारातून भाज्या आणल्यानंतर पाण्यामध्ये सॅनिटायझर टाकून भाज्या धुतात. परंतु, हे आरोग्यास हानिकारक ठरते.
भाज्या आणल्यानंतर त्या नळाच्या पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्याव्यात. तसेच, यानंतर भाज्या धुण्यासाठी बेकिंग सोड्याचाही वापर करू शकतो. यामुळे शेतात भाज्यांवर मारलेली रसायने निघून जातात.
तुरटीच्या पाण्यात मिनीटभर भाज्या धुतल्याने त्यावरील सर्व जीवाणूंचा नायनाट होतो

सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ
तेल किंवा व्हॅसलिन लावावे
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते आणि हे त्वचेला हानी पोहोचविते. त्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर अनेक जण दिवसभरातून पाच-दहावेळा सॅनिटायझरचा प्रयोग करताना दिसतात. तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतर लगेचच हातांना खोबरेल तेल किंवा व्हॅसलीन लावले तर त्वचेच्या हानीपासूनही बचाव होऊ शकतो.
डॉ. वैशाली शिंगाडे, त्वचा रोग तज्ज्ञ, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com