विद्यार्थ्यांचे "सारथी' संकटात, ही आहे कारणे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

पहिल्याच आठवड्यात शाळा बंद झाल्याने वाहनचालकांचे मार्च महिन्याचे उत्पन्न बुडाले. एप्रिल आणि मे महिन्यात वाहने जागेवरच उभी ठेवावी लागली. गाठीला असणाऱ्या शिलकीतून कशीबशी गुजराण सुरू आहे. पर्याय नसल्याने बॅंकांच्या कर्जाचे हप्ते बुडत आहेत. ऐरवी विदर्भात 26 जूनपासून माध्यमिक वर्गांच्या तर 1 जुलैपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होतात. जून महिन्याचे तीन आठवडे लोटूनही शाळा कधी सुरू होतील याबाबत स्पष्टता नाही. या स्थितीत भविष्याची चिंता अधिकच गडद होऊ लागली आहे. 

नागपूर : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणारे ऑटो, व्हॅन व स्कूलबसचालक मात्र अजूनही मार्गच चाचपडत आहेत. मार्च महिन्यापासूनच त्यांची मिळकत थांबली आहे. यामुळे संसाराचा गाडा खेचण्यात दमछाक सुरू आहे. त्यातच वाहनांचे हप्ते चुकल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याउपरही शाळा कधी सुरू होतील याबाबत संभ्रम असल्याने भविष्याबाबतही अनिश्‍चितताच आहे. 

विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देणे आणि परत सोडून देण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ऑटोचालकांना प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध असला तरी खासगी व्हॅन व बसचालकांची गुजराण या व्यवसायावरच अवलंबून असते. वाहनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही त्याच मिळकतीतून होते. खासगी वाहनचालकांना महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत पालकांकडून शुल्क मिळते. 

चोरीच्या रकमेवरून झाला वाद, दारूच्या नशेत उचलला दगड आणि...

पहिल्याच आठवड्यात शाळा बंद झाल्याने वाहनचालकांचे मार्च महिन्याचे उत्पन्न बुडाले. एप्रिल आणि मे महिन्यात वाहने जागेवरच उभी ठेवावी लागली. गाठीला असणाऱ्या शिलकीतून कशीबशी गुजराण सुरू आहे. पर्याय नसल्याने बॅंकांच्या कर्जाचे हप्ते बुडत आहेत. ऐरवी विदर्भात 26 जूनपासून माध्यमिक वर्गांच्या तर 1 जुलैपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होतात. जून महिन्याचे तीन आठवडे लोटूनही शाळा कधी सुरू होतील याबाबत स्पष्टता नाही. या स्थितीत भविष्याची चिंता अधिकच गडद होऊ लागली आहे. 

शासनाकडून मदत मिळावी 
गेल्या दहा वर्षांपासून स्कूलव्हॅन चालवूनच गुजराण करतो आहे. घरी खाणारी सहा तोंडे आहेत. गाठीला असणारी शिल्लकही संपली. आता हात रिकामे झाले आहेत. मध्यंतरी भाजीचा व्यवसायही करून पाहिला. पण, सर्वच जण भाजीविक्रीत आल्याने मालाचा खर्च काढणेही कठीण झाले. खासगी कामगारांना अर्धे वेतन तरी मिळाले. पण, व्हॅनचालकांना कुणी विचारलेही नाही, ही कैफियत आहे पवन ढोमणे यांची. बिकट स्थितीत शासनानेच मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school van driver in trouble