
नागपूर : राज्यातील ५ ते ८ वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. मात्र, महापालिका हद्दीतील शाळा ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. मात्र, शाळांनी पालकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना स्कूल बसचे वर्षभराचे पैसे पाठवा मगच शाळेत या, अशी ताकीद विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आली आहे.
राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून ८ फेब्रुवारीपासून नागपूर शहरातील शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे दहा महिन्यांपासून पालकांना शिक्षण शुल्कासाठी छळणाऱ्या खासगी शाळांनी आता शाळा सुरू होण्याचे आदेश येताच इतर मार्गांनी वसुली सुरू केली आहे.
शहरातील प्रतिष्ठित अशा नारायणा शाळेने चक्क पालकांना पत्र पाठवित मुलांना शाळेच्या स्कूल बसने शाळेत पाठवायचे असेल तर पालकांना वर्षभराचे शुल्क जमा करावे लागणार अशी सक्त ताकिद दिली आहे. अन्यथा स्वत: पालकांनी त्यांना सोडावे अशा सूचना दिल्या आहेत.
याशिवाय खासगी वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीत शाळा सुरू झाल्यावर पुढचे दोन महिने शाळा असताना वर्षभराचे स्कूल बसचे पैसे कुठल्या नैतिक आधारावर मागितले जात आहेत, असा सवाल पालकांकडून होत आहे.
नारायणासह इतर खासगी शाळांनीही अशाप्रकारे पत्र पाठवून पालकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये शाळांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांना विचारणा केली असता, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत, कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
नारायणा शाळेने पालकांकडून शैक्षणिक शुल्काच्या नावावर अतिरिक्त शुल्क वसुली केल्याचा ठपका ठेवत १ कोटी ७६ लाखांचा दंड ठोठावला. सांदिपनी शाळेवरही ३ कोटींची वसुली निघण्याचा अहवाल जमा करण्यात आला. याशिवाय इतर शाळांवरही प्रशासनाकडून दंड आकारण्याची तयारी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.