
नागपूर : आजही अनेकांच्या घरामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये साठवलेले पाणी प्याले जाते. रात्री ताब्याच्या भांड्यात पाणी साठवून सकाळी प्यावे असे म्हणतात. तांब्याच्या भांड्यामध्ये साठवलेले पाणी आरोग्यासाठी चांगले असते, असे जुने जाणकार सांगतात. बदलत्या काळानुसार लोक हातात कडा घालायला लागले. काही लोक तांब्याचे कडा घालतात. हातात तांब्याचा कडा (ब्रेसलेट) घातल्याने काय फायदे होतात, याची माहिती जाणून घेऊया...
आजचा जमाचा हा स्टाईलचा आहे. प्रत्येकजण आपण सर्वांपेक्षा वेगळे दिसावे यासाठी काही ना काही करीत असतो. आकर्षक कपडे, नवनवी हेअरस्टाईल आदी गोष्टी केल्या जातात. दुसऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अनेकांचा आटापीटा सुरू असतो. तसेच काही जण हातात वेगवेगळ्या प्रकारचे कडे घालून काही तरी अनोखा करण्याचा प्रयत्न करीत असतात.
अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांत ब्रेसलेट घातले आहेत. त्याला पाहून अनेकांनी ब्रेसलेट घालायला सुरुवात केली. त्याच्या चाहत्या वर्गांत ब्रेसलेट भरपूर फेमस झाले आहे. तसेच बॉलिवूडचा सिरियल किसर अभिनेता इमरान हाशमी याने देखील अनेक चित्रपटांमध्ये हातात ब्रेसलेट घातले होते. त्याने घातलेले चामड्याचे ब्रेसलेट चांगलेच लोकप्रिय झाले. इमरान हाशमीच्या चित्रपटानंतर अनेक युवक असे ब्रेसलेट घालून फिरतान दिसले.
तांब्यात अँटी-ऑक्सिडंड गुण असतात. जे शरीरातील वाईट पदार्थ वाढण्यापासून रोखतात. तसेच तांबे घातल्याने त्वचा तरुण राहते. तांबे शरीरातील टॉक्सीन कमी करण्याचे काम करते. तांबे एंजाइम्सच्या प्रतिक्रियेलाही ट्रिगर करते. जे शरीरात हिमोग्लोबीन बनवण्यात मदत करीत असते. तांब्याचे ब्रेसलेट घातल्याने मन शांत राहते आणि रागावर नियंत्रण मिळवता येते.
हृदयासाठी फायदेशीर
तांब्याच्या कमतरतेने शरीरात असंतुलन निर्माण होते आणि रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदय आणि नसांवर वाईट परिणाम होऊ शकते. म्हणून यावर उपाय म्हणून तांब्याचे कडे किंवा ब्रेसलेट घालावे. तांब्याला क्रॉस-लिंक फायबर, कोलेजन आणि इलास्टिनसाठी विशेष मानले जाते.
गुडघ्याचे दुखणे होते बरे
तांब्याच कडे, अंगठी किंवा बांगडी घातल्याने गुडघ्याचे दुखणे कमी होते. हे कडे घातल्याने हिवाळ्यात वाढणारे दुखणे कमी होते. जुने दुखणे अर्थात ऑस्टियोआर्थराइटिसमध्ये सुद्धा हे खूप फायदेशीर ठरतात. तांब्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे ते घातले पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की वापरच असलेले तांबे शुद्ध असावे.
रक्त होते शुद्ध
तांब्याने रक्त शुद्ध होते. हिमोग्लोबीन वाढते आणि शरीरातील रक्तपुरवठा देखील सुरळीत राहते. सोबतच तांब्यामुळे शरीराचा विषारी धातूंच्या प्रभावापासूनही बचाव होतो. कॉपर ब्रेसलेटमुळे हृदय निरोगी राहते. याने हृदयरोग किंवा हार्ट अटॅकसारख्या समस्याही रोखल्या जाऊ शकतात. तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट वापरल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यात मदत मिळते. तांब्याच्या ब्रेसलेटचा वापर केला तर व्यक्तीचा ब्लड प्रेशर आधीपेक्षा स्थिर राहतो.
आयुर्वेदात सांगितले त्रिदोष
आयुर्वेदाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वात, कफ आणि पित्त हे तीन दोष आहेत. या त्रिदोषांना संतुलित ठेवण्याचे काम तांबे करीत असते. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवल्याने त्या तांब्याचे गुण पाण्यामध्ये उतरतात व हे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक तांबे मिळते. तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी पिताना ते पाणी किमान आठ तास साठवलेले असावे. तांबे हे एक असे धातू आहे, ज्याच्या स्पर्शाने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात. हेच कारण आहे की, अनेक लोक तांब्याचे ब्रेसलेट घालतात. तांब्याच्या कड्यामुळे शरीरात सकारात्मक भाव निर्माण होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.