पेंचची जलवाहिनी फुटली; आज पाणी नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

गुरुवारी अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीसाठी तब्बल बारा तासांचे शटडाउन घेण्यात आले आहे. 

नागपूर  : शहराला पाणीपुरवठा करणारी पेंचची फीडर लाइन कोराडी मार्गावरील वॉक्‍स कूलरजवळ फुटल्याने उद्या, गुरुवारी अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीसाठी तब्बल बारा तासांचे शटडाउन घेण्यात आले आहे. 

क्‍लिक करा :आता पदव्यांसाठीही वाट्‌टेल ते ... 

12 तास शटडाउन 
महापालिकेचा जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यूने लिकेज दुुरुस्तीला सुरुवात केली आहे. याकरिता पाणी प्रक्रिया केंद्रापासून पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आशीनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर येथील जलकुंभांना फटका बसला आहे. बुधवारच्या रात्रीचा पाणीपुरवठा या जलाकुंभांवरून होणाऱ्या वस्त्यांना होणार नाही. याशिवाय गुरुवारी सकाळचासुद्धा पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय तातडीने पाणीपुरवठा बंद केल्याने नारा, नारी, जरीपटका, नालंदानगर, धंतोली ओमकारनगर, म्हाळगीनगर, हुडकेश्‍वर आणि नरसाळा गावाचाही पाणीपुरवठा बाधित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The screwdriver burst; No water today