Valentine Day Special : एकमेकांना समजण्यातच दडलंय प्रेमाच गुपित

The secret of love lies in understanding each other Valentine Day Special
The secret of love lies in understanding each other Valentine Day Special
Updated on

नागपूर : प्रेमविवाह करणारे जोडपे ‘आम्ही एकमेकांना योग्यरीत्या ओळखतो’, असे ठासून सांगतात. अरेंज्ड मॅरेज केलेल्या जोडप्यांपेक्षा लव्ह मॅरेज केलेले जोडपे एकमेकांना चांगल्याने ओळखतात, असा त्यांचा (गैर)समज असतो. भेटीगाठी होण्याच्या संख्येचा विचार केल्यास हा समज चुकीचा नाही असे वाटते. परंतु, जोडप्यांमध्ये होणारी ताटातूट लक्षात घेतली तर यामागील नेमकी अडचण लक्षात येते. लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड, दोन्ही बाबतीत एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे एकमेकांना समजण्याची...

‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त वाचकांसाठी वेगळा विषय घेऊन आलो आहे. आजच्या तरुणांना अरेंज्ड मॅरेज कराल की लव्ह मॅरेज? असे विचारणे चुकीचे आहे. कारण, प्रेम म्हणजे काय? हे त्यांना माहीतच आहे. प्रेम झालेल नसावं किंवा प्रेमाची अनुभूती आलेली नसावी, असा कुणीही सापडणार नाही. फरक एवढाच की, कोणी बोलून दाखवेले, तर कोणी आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवले.

‘प्रेम’ शब्द उच्चारला गेला, तर अवघ्या अडीच अक्षरांत बंदिस्त झालेला. मात्र, सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवण्याची ताकद या शब्दात आहे. प्रेमाचे रंग-ढंग आणि स्वरूप अनेक असले तरी प्रत्यक्षात प्रेमाची महती काही वेगळी नाही. प्रेमाचं नातं हे फार पवित्र. आईचं मुलांप्रती, बहीणभावांचं एकमेकांप्रती असलेलं किंवा वडिलाचं मुलांप्रती असलेलं प्रेम हे नि:स्वार्थ प्रेमाचे उदाहरण आहे. प्रेमाला काहीच सीमा नाही. त्यामुळेच प्रेमाला निखळ भावनेचा सागर म्हणून संबोधले जाते.

प्रेमाचा थेट संबंध हा हृदयाशी असतो. तसं पाहिलं तर प्रेम वाटतं तितकं सोपं नाही. म्हणतात ना ‘प्यार की आग दोन्ही तरफ हो तो मजा देती हैं. लेकीन एकतफा हो तो फूंक देती है.’ आपण अशा अनेक घटना वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो. एकतर्फी प्रेमामुळे अनेक तरुण-तरुणी उद्ध्वस्त झाले आहेत. याचे परिणाम त्यांच्यासह कुटुंबीयांनाही भोगावे लागले आहेत. प्रेमाचा विरोध करणारे म्हणतात, ‘प्यार का पहिला अक्षर ही अधुरा है, तो वो दो लोगों को कैसे पुरा करेगा?’ मात्र, याचा किंवा अशा प्रकारच्या घटनांचा प्रेमवीरांवर कोणताही परिणाम होत नाही.

पोहे व चहाचा आस्वाद घेत मुलाचे आई-वडील व भाऊबहीण समोर बसलेल्या मुलीला नाव आणि शिक्षणाच्या बाबतीत काही ‘बेसिक’ प्रश्न विचारून आपली पसंती दिल्यानंतर लग्न करण्याचे दिवस आता मागे पडत आहे. पूर्वी तर यापेक्षाही वेगळा प्रकार असायचा. आई-वडिलांनी सून पसंत केलेली असे. मुलीला तर पसंती विचारण्याचा प्रश्नच नवता. अशा प्रकारच्या विवाहाविषयी आताची मुले आश्चर्य व्यक्त करतात. परस्परांना पाहिले नाही. 

एकमेकांशी बोलले नाही, आवडी-निवडीचा तर दूरपर्यंत काहीच पत्ता नाही. असे असताना लग्न कसे करायचे? एकमेकांची भेट घेणे. विचार समजून घेणे व आवडी-निवडी लक्षात येणे आदी गोष्टींना आताची पिढी प्राथमिकता देत असते. काहींच्या दृष्टीने तर परस्परांना जाणून घेण्यासाठी निदान वर्ष-दोन वर्षांचा तरी सहवास असावा. अफेअरदरम्यान एक किंवा दोन वर्षांच्या सहवासात तरी दोघे एकमेकांना व्यवस्थित ओळखू शकतात का, हा प्रश्न निर्माण होतो.

फायदे-तोटे यांचा विचार दोन्हीकडे

खरं तर प्रेमाचा अर्थच पार बदलला आहे. प्रेमात फक्त द्यायचं असतं, असं म्हणतात. आजघडीला अनेक धुरंधर प्रेम किंवा लग्न करताना जोडीदाराची आर्थिक स्थिती लक्षात घेतात. हे अरेंज्ड आणि लव्ह मॅरेज दोन्हीच्या बाबतीत घडते. तसाही तो किंवा ती किती श्रीमंत आहे? या गोष्टीचा विचार करून कोणाशी प्रेम करायचं किंवा अरेंज्ड मॅरैज करायचा याचा विचार आजकाल सर्रास केला जातो. लव्ह मॅरेजमध्ये याची निवड दोघेच करतात, तर अरेंज्ड मॅरेजमध्ये कुटुंबातील सदस्यांचा आधार घेतला जातो. दोन्ही ठिकाणी उद्देश मात्र सारखाच असतो. याचे फायदे-तोटे मात्र दोघांनाही आणि दोन्ही कुटुंबांना सोसावे लागतात.

...तर संसार नक्कीच नेटाचा होईल

संसाराचा गाडा ओढताना दोघांनीही आनंद उपभोगणे महत्त्वाचे असते. तो गाडा लव्ह मॅरेजचा आहे की अरेंज्ड मॅरेजचा, हे महत्त्वाचे नाही. परस्परांना समजून घेण्याची क्षमता असेल, एकमेकांच्या चांगल्या वाईट सवई स्वीकारणे आणि एकमेकांवर विश्वास व्यक्त करण्याची प्रक्रिया ज्या जोडप्यांमध्ये पार पडत असेल, तर दोघांमधील प्रेम बहरेल व संसार नक्कीच नेटाचा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com