बघा शाळा सुरू होण्याबाबत काय म्हणाले पालक, शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

राज्यात पश्‍चिम महाराष्ट्रात 15 जून तर विदर्भात 26 जूनपासून शाळांना सुरुवात होते. मात्र, यावर्षी राज्यासह देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल आहे. या प्रकाराने अद्याप शाळा सुरू करू नये याबाबत पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे करोनामुळे पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकता सध्यातरी दिसून येत नाही.

नागपूर : राज्यात शाळा सुरू करण्याबाबत बराच खल सुरू आहे. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळा सॅनिटाईझ करा आणि तशा सुविधा द्या अशी मागणीच आता शाळा आणि शिक्षक संघटनांकडूनम करण्यात येत आहे.

 

राज्यात पश्‍चिम महाराष्ट्रात 15 जून तर विदर्भात 26 जूनपासून शाळांना सुरुवात होते. मात्र, यावर्षी राज्यासह देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल आहे. या प्रकाराने अद्याप शाळा सुरू करू नये याबाबत पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे करोनामुळे पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकता सध्यातरी दिसून येत नाही.

हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांना वेगळीच धास्ती....वाचा काय आहे कारण

सरकारचा त्याबाबत निर्णय झाल्यास शाळांना विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. यात प्रामुख्याने "थर्मल स्कॅनर', सर्व शाळांना सॅनिटायजेशनसाठी फवारणी किटसह दरमहा किमान 50 लिटर सॅनिटायजरचा पुरवठा करणे, ऑनलाइन शैक्षणिक व्यवस्थेसाठी प्रोजेक्‍टर, कॉम्प्युटर, इंटरनेट सुविधा देणे, एका गटाला तीन तासांची शाळा भरविणे, शिक्षकांना "हॅंड ग्लोव्हज', "पीपीई किट' व इतर आवश्‍यक साधने देऊन प्रशिक्षण देणे, कोविड कारणास्तव शिक्षकांना इतरत्र देण्यात आलेल्या नियुक्‍त्या रद्दबातल करणे आदींचा समावेश आहे. हे केल्याशिवाय शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होण्याची शक्‍यता आहे.

मनशिसेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
केंद्र शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात पुरेसे नियोजन करण्याची विनंती करणारे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेत्तर सेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व केंद्रीय मनुष्यबळमंत्री यांना ई-मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये शाळांना थर्मल स्कॅनरसह सॅनिटायजेशनसाठी फवारणी किटसह दरमहा किमान 50 लिटर सॅनिटायजरचा पुरवठा करण्याची मागणीही महेश जोशी, शरद भांडारकर, हरीश बुरंगे, जावेद शेख, विश्वास रामटेककर, नितीन किटे यांनी निवेदनातून केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See what parents and teachers say about starting school