भाजीपाल्याच्या वाडीत पाणी देण्यासाठी गेले बहीण-भाऊ; नदीच्या प्रवाहात मुलगा गेला वाहून

seven year old boy drowned in the Kanhan River
seven year old boy drowned in the Kanhan River
Updated on

टेकाडी (जि. नागपूर) : सिहोरा शिवारात कन्हान नदी काठावर ग्रामस्थ उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लावतात. लावलेल्या वाडीत मेथी भाजीला पाणी देण्यास आई आणि तिच्या बहिणीसह सात वर्षीय मुलगा गेला होता. दरम्यान नदीकाठावर फिरत असताना बालकाचा तोल गेला आणि नदीच्या प्रवाहात मुलगा वाहून गेला. घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली असून, रात्री उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन विनायक मेश्राम (वय ७, रा. सिहोरा, कन्हान) असे नदीत वाहून गेलेल्या बालकाचे नाव आहे. सिहोरा शिवारात नयनच्या कुटुंबीयांनी कन्हान नदीकाठावर छोटीशी भाजीपाल्याची वाडी लावलेली होती. जिथे बुधवारी नयन हा आई चंदा मेश्राम व बहीण श्वेता मेश्राम हिच्यासोबत मेथी भाजीला पाणी देण्यास गेला.

दरम्यान, नदीकाठावर फिरत असताना अचानक त्याचा पाय घसरून नदीच्या पात्रात तो वाहू लागला. भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याला वाचविण्यासाठी श्वेताने नदीत उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने श्वेतादेखील पाण्यात बुडू लागली. अशात तिच्या आईने आरडाओरड केली असता मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि श्वेताचा जीव वाचविला.

श्वेता झाली बेशुद्ध

पाण्यात बुडाल्याने श्वेता बेशुद्ध झाली होती. ग्रामस्थांनी नयनचा शोध घेतला; परंतु, त्याचा शोध लागला नव्हता. सायंकाळी कुटुंबीयांनी कन्हान पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. उशिरा बातमी लिहिस्तोवर नयनचा पत्ता लागला नव्हता.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com