esakal | ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar has the right to make Partha angry

घरातील एक मुलगा किंवा नातू चूक करीत असेल, तर कुटुंबप्रमुख या नात्याने त्याला रागावण्याचा आजोबांचा अधिकार आहे. कुटुंबप्रमुखांनी फटकारल्यावर मुलांनी स्वतःमध्ये सुधारणा करून घेणे, ही आपली संस्कृती आहे. पार्थ पवारही तेच करतील, असा विश्‍वास आहे. या विषयाला आता आणखी ओढण्यात करण्यात काहीही अर्थ नाही.

ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये काहीतरी चुकीचा संदेश गेला पाहिजे आणि आपली राजकीय पोळी शेकता आली पाहिजे, यासाठीच आता विरोधकांनी हातपाय आपटणे सुरू केले आहे. त्यांनी कितीही ओरड, आदळआपट केली, काव-काव केली, तरीही महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही. ते मुहूर्त काढत जातील, पण सरकार इंचभरही हलणार नाही, असा विश्‍वास काँग्रेसचे मंत्री विजच मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात जाऊन पार्थ पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. हे कमी झाले की काय म्हणून त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतरही काही काळ शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य केले नव्हते.

जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

बुधवारी त्यांनी ‘पार्थ अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही’, असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. काल सायंकाळी पार्थ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्याची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

घरातील एक मुलगा किंवा नातू चूक करीत असेल, तर कुटुंबप्रमुख या नात्याने त्याला रागावण्याचा आजोबांचा अधिकार आहे. कुटुंबप्रमुखांनी फटकारल्यावर मुलांनी स्वतःमध्ये सुधारणा करून घेणे, ही आपली संस्कृती आहे. पार्थ पवारही तेच करतील, असा विश्‍वास आहे. या विषयाला आता आणखी ओढण्यात करण्यात काहीही अर्थ नाही. सत्ता मिळविण्यासाठी कोणतेही विषय उभे करायचे आणि राज्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

फटकारणे हा आजोबांचा अधिकार

गेल्या तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ चर्चेत आहेत. कारण, राम मंदिराच्या भूमिपूजनाला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर राज्यभर विविध चर्चांना उधाण आले होते. आज बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना या विषयाबाबत विचारले असता, पार्थ पवार यांना फटकारणे, हा एका आजोबांचा अधिकार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे