वडिलांच्या प्रेमाला मुकल्याने तीने केले असे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

तिच्या आई-वडिलांमध्ये पटत नसल्याने 20 वर्षांपूर्वीच दोघांनीही घटस्फोट घेतला होता. मुलाला घेऊन तिचे वडील मुंबईला राहतात. मात्र, वडील आपल्याला कधीच मुलगी मानत नाहीत, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती.

नागपूर : कौटुंबिक नैराश्‍यातून एका उच्चशिक्षित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. साची सुधाकर डांगे (वय 26) असे या तरुणीचे नाव असून ती नागपूर शहरातील जयभीमनगर येथे राहत होती. 

आई-वडील झाले होते विभक्त 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साचीचे एम.टेक.पर्यंत शिक्षण झाले आहे. एक महिन्यापूर्वी तिला एका खासगी संस्थेत नोकरी लागली होती. तिला आई-वडील आणि एक भाऊ आहे. तिचे वडील मुंबई येथे मंत्रालयात नोकरीला आहेत. तिच्या आई-वडिलांमध्ये पटत नसल्याने 20 वर्षांपूर्वीच दोघांनीही घटस्फोट घेतला होता. मुलाला घेऊन तिचे वडील मुंबईला राहतात. मात्र, वडील आपल्याला कधीच मुलगी मानत नाहीत, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे ती निराश होती. 

अवश्‍य वाचा- प्रियकर म्हणाला, चल पळून जाऊ... बसले दुचाकीवर अन्‌ नेले इथे 

निराशेतून केला जीवनाचा शेवट 

रविवारी (ता.5) ती आणि तिची आई दोघीच घरी होत्या. आई हॉलमध्ये बसली असताना साचीने आपल्या खोलीत सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास लावला. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आईच्या लक्षात हा प्रकार आला. अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She did it because of her father's affection