esakal | नागपुरात शिवसेना आक्रमक! १४ दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी; गोळीबार चौकात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena protest for lockdown in nagpur

रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

नागपुरात शिवसेना आक्रमक! १४ दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी; गोळीबार चौकात आंदोलन

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले असून रुग्णसंख्या ६० हजारांवर पोहोचली आहे. ही  साखळी तोडण्यासाठी नागपूर महापालिका प्रशासनाने १४ दिवसांचा कडक लॉक डाऊन करावा या मागणीसाठी शिवसेनेने आज गोळीबार चौकात आंदोलन केले. तत्पूर्वी उपजिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांना या मागणीचे निवेदन दिले होते. 

हेही वाचा - चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

महापालिकेने शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यु लागू करण्याची घोषणा केली. पण या संचारबंदीमुळे कोरोनाची साखळी तुटणे अशक्य आहे. याकरिता उपजिल्हा प्रमुख सुरज गोजे, विधानसभा संघटक राजेश कनोजिया, सुनील बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महापालिका कोरोनाचे संक्रमण रोखण्यात संपूर्ण अपयशी ठरली आहे. 

रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. हे लक्षात घेऊन सरकारचे व महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. कोणतेही राजकारण न आणता सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन सुरज गोजे यांनी यावेळी केले. 

अधिक महितीसाठी - अधिक महिन्यात का करतात ३३ बत्ताशांचे दान; वाचा काय आहे माहात्म्य, आजपासून अधिक अश्विन

आंदोलनात गुलाम रसूल, पोटीवाला ,नरेंद्र मगरे, केतन रेवतकर, सुखदेव ढोके, महेंद्र काठाने, नरेंद्र मगरे,एजाज जीलानी,अनिल बोरकर, सागर मौन्देकर,धीरज काटे, विकास देशमुख,सतीश डायरे, चिंतामण परशिवणीकर, उत्तम रंभाड,इश्वर पिंपळे, हरीश पाठरबे,कपिल करोडकर,निखिल धकते, सुनील कावळे, नंदू मारोडे,फ़ैयाज कच्ची, तेजस गोजे, राजेश मातूरकर, नवीन बारापात्रे,अनुप साधनकर, जगदीश मंडलेकर,आदी सहभागी झाले होते.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

go to top